Join us

करिना कपूर म्हणाली आठवड्यातून चारवेळा मी ‘तेच’ खाते? माहितीये काय, जे खाताना तुम्ही नाक मुरडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 15:50 IST

Kareena Kapoor's Favourite Food: अभिनेत्री करिना कपूर हिने तिच्या आवडीच्या पदार्थाचं नाव नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं आहे... बघा तुमच्या आमच्या घरातही नेहमीच होणारा तो पदार्थ काेणता? (Kareena Kapoor telling about her favorite dish)

ठळक मुद्देकरिना कपूरच्या एका मुलाखतीचा एका छोटासा भाग सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

सर्वसामान्य लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की सेलिब्रिटी लोकांचा आहार हा सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप वेगळा असतो. बऱ्याचदा तसं असतंही.. कारण त्यांच्या डाएटनुसार ते बऱ्याचदा असे काही पदार्थ खातात ज्यांची नावं अनेक जणांना माहितीही नसतात. पण तरीही नेहमीच सेलिब्रिटींच्या घरात असे वेगवेगळे पदार्थच होतात असं नाही. शेवटी काही पारंपरिक भारतीय पदार्थ असेही असतात जे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्याच घरात होतात आणि अगदी आवडीने खाल्ले जातात. त्या पदार्थांपैकीच एक खास पदार्थ अभिनेत्री करिना कपूर हिलाही खूप आवडतो (Kareena Kapoor's Favourite Food). तो पदार्थ  नेमका कोणता ते पाहूया..(Kareena Kapoor telling about her favorite dish)

 

अभिनेत्री करिना कपूरचा आवडीचा पदार्थ काेणता?

करिना कपूरच्या एका मुलाखतीचा एका छोटासा भाग सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये करिना कपूर असे सांगते आहे की खिचडी हा तिच्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे.

१५ दिवसांतच मोगऱ्याला येतील भरपूर कळ्या- 'हे' खत घाला, घरभर दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

गरमागरम खिचडी आणि त्यावर थोडंसं साजुक तूप असा बेत रात्रीच्या जेवणात असला की मग ती खुश असते. आठवड्यातून कमीतकमी ४ ते ५ वेळा तरी ती खिचडी खाते. खिचडी खाण्यात २ ते ३ दिवसांचा गॅप पडला तरी तिला अस्वस्थ होऊ लागतं. विशेष म्हणजे तिचं खिचडी खाणं तिच्या डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनाही मान्य असून त्यांनीच तिच्या डाएट प्लॅनमध्ये खिचडी सांगितली आहे.

 

करिना कपूर दुपारच्या जेवणात मात्र भोपळा, भात, चपाती, डाळ असं काही खात असते. ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले काही महाराष्ट्रीयन पदार्थ तिला अतिशय आवडत असून बऱ्याचदा ते पदार्थ करून मला पाठवून दे असंही ती ऋजुता यांना हक्काने सांगत असते.

सावळा वर्ण असल्यास 'या' रंगाचे कपडे घाला- चेहऱ्यावर ग्लो येऊन दिसाल अतिशय आकर्षक

एकंदरीतच करिना कपूर ही प्रचंड फूडी असून वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं तिला आवडतं.. वय कितीही असलं तरी तुम्ही किती फिट आहात याला महत्त्व आहे, असंही करिनाने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकरिना कपूरअन्न