Join us

करिना कपूरच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट! म्हणाली आयुष्य बदललंय, ॲवॉर्ड शो, लेटनाईट पार्टीपेक्षा मला.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 20:34 IST

Kareena Kapoor Explains About The Changes In Her Carrier And Personal Life: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान करिना कपूरने आता तिच्या आयुष्यात झालेल्या काही बदलांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

ठळक मुद्देएक विशिष्ट वय गाठल्यानंतर करिना प्रमाणेच प्रत्येकीचं आईपण आणि बाईपण या वळणावरून जातच असेल नाही का?

करिना कपूरने आजवर तिच्या करिअरमध्ये कित्येक वैविध्यपुर्ण भूमिका केल्या आहेत. प्रत्येक भुमिकेला न्याय देत ती तिची ओळख निर्माण करत गेली. बॉलीवूडमध्ये एक मोठा यशस्वी प्रवास तिने आजवर केला आहे आणि अजूनही तो सुरूच आहे. पण करिनाने मात्र आता या प्रवासात तसेच तिच्या खाजगी आयुष्यातही काही बदल केले आहेत. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आणि आयुष्यात थोडं स्थैर्य आल्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य माणूसही थोडाफार बदलतोच. तसंच काहीसं करिनाचंही झालं आहे. तिच्यामध्ये नेमकं काय बदल झाले किंवा तिने स्वत:ला काही बाबतीत कसं मोल्ड करून घेतलं याविषयी तिनेच काही गोष्टी सांगितल्या..(Kareena kapoor explains about the changes in her carrier and personal life)

 

करिनाने नुकतीच Nod magazine ला एक मुलाखत दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली की आज एकेका चित्रपटांमध्ये भूमिका मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण अभिनेत्रींना पाहाते तेव्हा मी स्वत:ला नशिबवान समजते. कारण एकेकाळी मी ही तेच केलं होतं पण आता मात्र मी त्या टप्प्यातून बाहेर पडले आहे. आता मला खूप चित्रपट करायचेच नाहीत. वर्षातून १ ते २ प्रोजेक्ट करायचे आणि त्यासाठीचं माझं टॅलेंट, माझी एनर्जी वापरायची. क्वांटीटी पेक्षा क्वालिटीकडे लक्ष देण्यावर आता माझा भर आहे.

 

करिअरच्या दृष्टीने करिनाने हा जसा बदल केला तसाच तिच्या खाजगी आयुष्यातही अनेक बदल केले आहेत. ती, सैफ आणि तिची दोन्ही मुलं रात्रीचं जेवण ६- ६: ३० दरम्यान घेतात आणि त्यानंतर ९: ३० वाजता झोपीही जातात. लेटनाईट पार्टी त्यांनी पुर्णपणे बंद केल्या आहेत.

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर

करिना म्हणते मुलांना एकटं सोडून एखाद्या पुरस्कार सोहळ्याला जाणं मला आता पटत नाही. त्यापेक्षा नवरा आणि मुलांसोबत तो सोहळा टीव्हीवर एखादी वाईन घेत घेत एन्जॉय करणं मला जास्त आवडू लागलं आहे. करिनाला आता करिअर तर करायचं आहे, पण ते करताना तिचं कुटूंब, तिची मुलं यांचीही काळजी घ्यायची आहे. एक विशिष्ट वय गाठल्यानंतर करिना प्रमाणेच प्रत्येकीचं आईपण आणि बाईपण या वळणावरून जातच असेल नाही का?

टॅग्स :सोशल व्हायरलकरिना कपूरसैफ अली खान