Join us  

फक्त २ पदार्थ वापरा- गॅस शेगडीपासून ते तेलकट टाईल्सपर्यंत सगळं स्वयंपाकघर होईल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 11:14 AM

Homemade Multipurpose Liquid To Clean Your Kitchen : स्वयंपाक घर नेहमीच चकाचक ठेवायचं असेल तर हे एक होममेड लिक्विड तुमच्याकडे नेहमीच तयार असू द्या... (How to clean oily greesy stains on kitchen tiles in marathi)

ठळक मुद्देस्वयंपाक घर चकाचक करण्यासाठी घरच्याघरी कोणतं लिक्विड तयार करायचं, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ mama_mila_au या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

स्वयंपाक घर ही घरातली अशी एक जागा असते की जिथे नेहमीच काहीतरी सांडतं, काहीतरी पडतं, पदार्थ शिजवताना कशावर तरी काहीतरी उडतं.... अशा एक ना अनेक कारणांमुळे स्वयंपाक घर नेहमीच अस्वच्छ होत असतं. म्हणून ते अगदी रोजच्या रोज  न चुकता आवरावंच लागतं. कारण संपूर्ण कुटूंबाचं आरोग्य तिथूनच जपलं जातं. त्यामुळे अगदी गॅस, किचन ओट्यापासून ते एक्झॉस्ट फॅन, किचन ट्रॉलीपर्यंत सगळं स्वच्छ असणं गरजेचं असतं (Just 2 ingredients to clean your kitchen). म्हणूनच स्वयंपाक घरातल्या या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी स्वयंपाक घरातलेच हे २ पदार्थ वापरा (How to clean oily greesy stains on kitchen tiles). यामुळे अगदी किचन ओट्यापासून ते स्वयंपाक घरातल्या तेलकट झालेल्या टाईल्सपर्यंत सगळं काही स्वच्छ करता येतं. ते ही अगदी कमी मेहनतीत. (Homemade multipurpose liquid to clean your kitchen in marathi)

 

स्वयंपाक घर स्वच्छ करण्यासाठी सोपा उपाय

स्वयंपाक घर चकाचक करण्यासाठी घरच्याघरी कोणतं लिक्विड तयार करायचं, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ mama_mila_au या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

संक्रांतीला जावयासाठी निवडा हलव्याचे सुंदर दागिने- लेकीसह जावयाचंही कौतुक- पहिला संक्रांतसण होईल स्पेशल

हे लिक्विड तयार करण्यासाठी आपल्याला व्हाईट व्हिनेगर आणि लिंबाचा रस एवढ्या दोन गोष्टी लागणार आहेत. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही लिक्विड डिशवॉश सोप वापरू शकता. किंवा लिंबू आणि डिशवॉश सोप असं दोन्हीही वापरलं तरी अधिक चांगलं.

सगळ्यात आधी तर एका स्प्रे बॉटलमध्ये एक कप गरम पाणी टाका. या पाण्यामध्ये अर्धा कप व्हाईट व्हिनेगर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस किंवा लिक्विड डिशवॉश सोप टाका. 

आता हे लिक्विड व्यवस्थित हलवून घ्या आणि तुम्हाला स्वयंपाक घराचा जो भाग स्वच्छ करायचा आहे, त्यावर शिंपडा. ३ ते ४ मिनिटांनी ती जागा पुसून घ्या. त्याठिकाणचा तेलकटपणा कमी झालेला असेल.

 

या लिक्विडचा वापर कुठे करता येईल?

गॅस शेगडी आणि किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी हे लिक्विड उपयुक्त आहे.

व्यायामानंतर खूप थकता? अंशुका परवानी सांगतात बदामासोबत 'हा' पदार्थ खा- दिवसभर ॲक्टीव्ह राहाल

ओट्याच्या वर ज्या टाईल्स असतात, त्यांच्यावरचा चिकटपणा- तेलकटपणा कमी करण्यासाठी उपयुक्त.

किचन ट्रॉलीचा आतला भाग तसेच बाहेरचा लाकडी भाग स्वच्छ करण्यासाठी.

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकिचन टिप्सहोम रेमेडी