भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे परदेशातील अनेक लोक भेट देत असतात. काही कामानिमित्त तर काही फिरण्यासाठी येतात.(Japanese Tourists Clean Puri Beach Odisha) त्यातील एक जगन्नाथपुरी. ओरिसाची राजधानी भुवनेश्वरजवळील पुरी शहर हे भारतातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.(Puri Beach Cleanup Mission by Japanese Volunteers) हे शहर भगवान जगन्नाथाच्या भव्य मंदिरासाठी प्रसिद्ध असून चार धामांपैकी एक आहे. पुरीमध्ये दरवर्षी होणारी जगन्नाथ रथयात्रा जगभर प्रसिद्ध आहे. हे शहर बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे. (Odisha Beach Cleanliness Campaign by Japanese Tourists)
पुरीचे सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. हे ठिकाण धार्मिक पर्यटकांसाठी तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जपानी महिला पर्यटक अकी देई अनेकदा पुरीला भेट देतात. यंदाचा त्यांचा प्रवास खास असणार आहे. अकी दोई ही कानाझावा (जपान) येथील रहिवासी आहे. व्यवसायाने संगीत आणि योग शिक्षक आहे. २०२२ मध्ये ओरिसाच्या पहिल्या भेटीत तिला पुरी शहराच्या प्रेमात पडले. तेव्हापासून त्या नियमितपणे राज्यात येत आहे. यावेळी तिचा प्रवास स्वच्छता मोहिमेत बदलला आहे. पुरी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलून समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे स्थानिकांचे लक्ष वेधले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दमलेल्या आईची गोष्ट! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात डोळे मिटून बसलेल्या अनुष्का शर्माला लागली डुलकी आण
समुद्रकिनाऱ्यावरुन कचरा गोळा करताना जपानी पर्यटक
टीओआयच्या वृत्तानुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी पुरीमध्ये आल्यानंतर ३८ वर्षीय डोई समुद्रकिनाऱ्यावरुन कचरा गोळा करत आहेत. जपानी लोक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करत आहे. यामध्ये अकी दोई यांनी भगवान जगन्नाथांचे चित्र दाखवत स्वच्छतेवरील संदेश असलेले बॅनर दाखवले. जागरुकता निर्माण करण्यासाठी त्या बीच वर फिरत असतात. डोई म्हणतात, मला हे करायला खूप आवडते. प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी आणि समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगारांची नियुक्ती केली . पण मी आपला पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी माझे कर्तव्य बजावत आहे.