ऐकावं ते नवलच असं वाटण्यासारखाच हा प्रकार आहे. ब्रा चे इतर सगळे प्रकार एकीकडे आणि हा एक प्रकार दुसरीकडे अशी ही गोष्ट आहे. बहुसंख्य लोकांच्या मोबाईलमध्ये अशी सेटिंग असते की आपल्या हाताच्या पहिल्या बोटाचा स्पर्श झाल्याशिवाय मोबाईल अनलॉक होत नाही. कित्येक ऑफिसेसमध्येही बायोमेट्रिक थंब हा प्रकार असतो. आता तोच प्रकार चक्क ब्रा मध्ये आला आहे. जपानच्या काही तरुणांनी मिळून चक्क बायोमेट्रिक ब्रा तयार केली आहे. या ब्रा च्या मागच्या बाजुला एक बटन असून ते म्हणे फक्त एखाद्या खास व्यक्तीच्या फिंगरप्रिंटनेच उघडू शकतात.(Japanees students invented biometric bra)
प्रयोग म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी ही ब्रा तयार केली असली तरी पार्टनरवरचं प्रेम आणि विश्वास तसेच महिलांची सुरक्षा या गोष्टी विचारात घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. वरवर पाहता ही ब्रा इतर ब्रासारखीच दिसणारी आहे.
साऊथ इंडियन लोकांसारखे दाट, काळेभोर केस हवे? 'हे' तेल लावा, महिनाभरात फरक दिसेल
तिला बाह्यभागात आणि आतून मऊ कपडा लावण्यात आला असल्याने ती घालायला आरामदायीच आहे. पण तिला ठिकठिकाणी सेन्सॉर आहेत आणि मागच्या बाजुला बायोमेट्रिक बटन आहे. या बटनावर जेव्हा मॅच होणारे फिंगरप्रिंट येतील, तेव्हाच ती उघडेल, अशी तिची रचना आहे. ही ब्रा ज्या उद्देशासाठी तयार करण्यात आली आहे, तो कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही.
पण ती एकदम वेगळ्या प्रकारची असल्याने फॅशन जगतात एक नवी हवा नक्की करणार.. भविष्यात अशा प्रकारच्या कस्टमाईज ब्रा तयार करण्याची मागणी होऊ शकते, असं मत फॅशन जगतातले लोक व्यक्त करत आहेत.
सफरचंद नुसतंच पाण्याने धुता? त्यावरचं मेण, चिकट केमिकल्स काढून टाकण्यासाठी 'या' गोष्टी गरजेच्या..
तर बऱ्याच महिलांचं हे मत आहे की अशा प्रकारची वेगवेगळे सेन्सॉर आणि बायोमेट्रिक मशिन बसवलेली ब्रा घालायला कितपत आरामदायी असावी, शिवाय तिच्यातल्या सेन्सॉरमुळे शरीरावर काही वेगळेच परिणाम तर होणार नाहीत ना याबाबत साशंकता आहे.
