Join us

मोबाइल लवकर चार्ज होत नाही, सतत हॅँग होतो? ५ उपाय- मोबाइल लवकर बिघडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 17:35 IST

Is your mobile slow? It takes a long time to charge? Try these solutions and charging will be done in no time : मोबाइल पटकन चार्ज होईल. फक्त लक्षात ठेवा या गोष्टी. बरेचदा साध्या कारणांमुळेच हँग होतो.

मोबाइल चार्ज व्हायला जास्त वेळ लागणे आणि सारखा हँग होणे या दोन अतिशय सामान्य समस्या आहेत. ज्या बऱ्याच लोकांना दररोज त्रास देतात. (Is your mobile slow? It takes a long time to charge? Try these solutions and charging will be done in no time.)या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात आणि त्यासाठी काही सोपे  उपाय आहेत. पाहा..

मोबाइल चार्जिंगमध्ये जास्त वेळ लागण्यामागे सर्वात सामान्य कारण म्हणजे खराब चार्जर किंवा चार्जिंग केबल. बऱ्याच वेळा आपण बाजारातून स्वस्त चार्जर वापरतो किंवा जुनी केबल वापरतो. ज्यामुळे फोन योग्य प्रमाणात वीज घेत नाही आणि चार्जिंगला वेळ लागतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाइलची चार्जिंग पोर्टमध्ये साठलेली धूळ. बरेचदा धूळ आणि कचरा पोर्टमध्ये अडकलेला असतो. ज्यामुळे चार्जर नीट कनेक्ट होत नाही.  एक स्वच्छ - कोरडा ब्रश किंवा टूथपिक वापरून काळजीपूर्वक पोर्ट स्वच्छ करता येतो.

मोबाइल सतत हँग होण्यामागेही अनेक सामान्य कारणे असतात. सर्वात आधी जाणून घ्या की तुमच्या फोनमध्ये किती अ‍ॅप्स आहेत आणि त्यांपैकी किती अ‍ॅप्स सतत बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात. कमी RAM असलेल्या मोबाइलमध्ये जास्त अ‍ॅप्स चालवले तर तो हँग होतोच. अनेक वेळा आपण जुन्या अ‍ॅप्स अपडेट करत नाही, त्यामुळे त्या अ‍ॅप्समध्ये बग्स राहतात आणि ते सिस्टमला स्लो करतात. त्यामुळे फोन सतत हँग होतो.

तसेच, फोनची इंटरनल मेमरी भरली असेल तरी हँग होण्याची शक्यता असते. अनेक वेळा आपण गरज नसलेले फोटो, व्हिडिओ, अ‍ॅप्स, किंवा वॉट्सअपच्या मिडिया फाईल्स फोनमध्ये उगाच साठवन ठेवतो. ज्यामुळे स्टोरेज भरते. त्यामुळे फोनमध्ये नवीन प्रोसेस होण्यासाठी जागा राहत नाही.

घरगुती उपाय म्हणून, दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यांनी फोन साफ करायचा. साफ करायचा म्हणजे  गरजेचे नसलेले अ‍ॅप्स अनइंस्टॉल करायचे. cache क्लिअर करायचे आणि जुन्या फाइल्स डिलीट करुन टाकायच्या. फोनचा डेटा बॅकअप घेऊन, कधीकधी Factory Reset करणं हा सुद्धा एक उपाय असू शकतो. विशेषतः फोन खूपच स्लो झाला असेल तर.

चार्जिंगच्या बाबतीत, मोबाईल चार्ज करताना त्याचा वापर टाळावा. गेम खेळणे किंवा व्हिडिओ बघणे चार्जिंग दरम्यान टाळल्यास चार्जिंगची गती वाढते. शक्य असल्यास फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवावे, कारण अनेक वेळा नवीन अपडेट्समध्ये बॅटरी ऑप्टिमायझेशनसारखे महत्त्वाचे बदल असतात.

टॅग्स :मोबाइलवीजसोशल व्हायरलहोम रेमेडी