Lokmat Sakhi >Social Viral > I don’t cook or clean in India!-ऑस्ट्रेलियन महिलेचं म्हणणं भारतात वर्क-लाइफ बॅलन्सच नाही...

I don’t cook or clean in India!-ऑस्ट्रेलियन महिलेचं म्हणणं भारतात वर्क-लाइफ बॅलन्सच नाही...

Work-life balance in India: Why work-life balance is hard in India: भारतीय घरकाम आणि व्यावसायिक कामावर ऑस्ट्रेलियन महिलेच्या टिप्पणीने निर्माण झाला मोठा वाद.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 17:59 IST2025-04-30T17:53:56+5:302025-04-30T17:59:12+5:30

Work-life balance in India: Why work-life balance is hard in India: भारतीय घरकाम आणि व्यावसायिक कामावर ऑस्ट्रेलियन महिलेच्या टिप्पणीने निर्माण झाला मोठा वाद.

I don’t cook or clean in India Australian woman says there is no work-life balance in Indian people video goes viral in social media | I don’t cook or clean in India!-ऑस्ट्रेलियन महिलेचं म्हणणं भारतात वर्क-लाइफ बॅलन्सच नाही...

I don’t cook or clean in India!-ऑस्ट्रेलियन महिलेचं म्हणणं भारतात वर्क-लाइफ बॅलन्सच नाही...

I don’t cook or clean in India. Chores? I don’t know them. - असं एका ऑस्ट्रेलियन महिलेनं ऑनलाइन व्हिडिओ करत सांगितलं आणि व्हायरल चर्चेनं जोर धरला.(Australian woman in India) ही ऑस्ट्रेलियन महिला सांगते की भारतात अनेकांच्या घरी झाडू फरशी भांडी घासायला बाई येते.(No housework in India) इथे आल्यापासून मी ते केलेलं नाही.(Cultural differences in work-life) विदेशात नोकरी सांभाळून आपण सगळं करतो पण भारतात चित्रच भलतं आहे. इथे घरकामासाठी मदतनीसांवरच सगळे अवलंबून राहतात. (Foreigners living in India experiences)
मूळच्या ऑस्ट्रेलियन असणाऱ्या पण सध्या भारतात असणाऱ्या ब्री स्टील. त्या  पॉडकास्ट प्रोड्युसर आहेत.(House help and lifestyle in India) २०२३ पासून त्या भारतात राहतात. इथल्या अनुभवांवर त्यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या म्हणतात की भारतात अनेक कुटुंबांना स्वयंपाक आणि साफसफाईसारख्या कामांसाठी मदतीनसांवर अवलंबून राहातात. भारतात मी स्वयंपाक करत नाही किंवा साफसफाई करत नाही.

कितीही साफ करा स्विच बोर्डवरील काळे-मेणचट थर निघत नाहीत? ५ सोप्या ट्रिक्स, स्विच बोर्ड चमकेल नव्यासारखा


भारतातील बहुतेक मध्यमवर्गीय ते श्रीमंत कुटुंबांमध्ये घरकाम करण्यासाठी लोक नेमलेली असतात. बहुतेक घरात अशी व्यक्ती असते जी घरातील कामे करते. तर काही घरात स्वयंपाक, साफसफाई आणि कपडे-भांडी धुण्यासाठी बाई असते. पाश्चात्य देशांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. तिथली लोक इतरांच्या मदतीशिवाय पूर्णवेळ नोकरी आणि घरातील कामे करतात. त्यांच्या एका मित्राने सांगितले की, रोज साफसफाई आणि स्वयंपाक करणे मला शक्य नाही. त्यावर मी असे म्हटलं की, पाश्चात्य देशात आपण असे करतो. नोकरी आणि घर दोन्ही आपण व्यवस्थित सांभाळतो. पण इथे का शक्य होत नाही. 


स्टील म्हणतात की, भारतीय व्यावसायिक जास्त काम करतात. त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला रात्री ९.३० वाजेपर्यंत कामाचे कॉल्स येताना पाहिले आहे. या ठिकाणी काम आणि आयुष्य यांचा कोणताही वास्तविक समतोल नाही. त्याच जर तुमचे लग्न झाले नसेल तर घराकडे लक्ष देण्यासाठी देखील तुमच्याकडे वेळ नाही. हे जितके चांगले आहे तितके वाईट देखील. भारतात वर्क लाईफ बॅलेन्सचा समतोल नाही. तसेच कामगार स्वस्त आहेत, म्हणून आपण घरकाम करणाऱ्यांवर अवलंबून राहातो.

">


त्यांनी असं देखील म्हटलं की, स्वयंपाक किंवा साफसफाई न करण्याची सोय त्यांना किती आवडली आणि त्याबद्दल त्यांना लाज वाटत होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतातील सामाजिक नियम, आर्थिक असमानता आणि कार्य संस्कृती याबद्दल चर्चा सुरु झाली. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक युर्जसनी कमेंट्स देखील केल्या आहेत. तर एका युर्जसने म्हटले की, मी भारतात घरकाम करुन वाढलो आणि त्यानंतर पाश्चात्य देशात आलो. या ठिकाणी माझी सर्व कामे करुनही माझ्याकडे छंद आणि आरोग्यासाठी जास्त वेळ आहे. भारतात मदत मिळूनही मी सतत थकलेलो आणि अस्वस्थच असायचो.

 

Web Title: I don’t cook or clean in India Australian woman says there is no work-life balance in Indian people video goes viral in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.