Join us

नवऱ्याने लग्नात दिले अनोखे सरप्राइज गिफ्ट, व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, तू खरी भाग्यवान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2023 20:33 IST

Groom Made A Live Painting Of His Wife At Their Wedding : ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वराने आपल्या लग्नात पत्नीचे लाइव्ह पेंटिंग केले.

प्रत्येक जोडप्याला आपलं लग्न खास व्हावं असं वाटत असत. त्यातल्या त्यात नवरीला हे अजूनच जास्त वाटत असत. त्याने मला सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज करावं, माझ्याबद्दल चार प्रेमाच्या गोष्टी सगळ्यांना सांगाव्यात, आपल्या प्रेमाची जर्नी कशी सुरु झाली याबद्दल सांगावं, माझ्यासोबत एक रोमँटिक डान्स करावा अशा नानाविविध इच्छा मुलींच्या मनी असतात. मग आपली ही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी त्या आपल्या जोडीदाराच्या खूप मागे लागतात.. तू मला अमुक अमुक असं प्रपोज कर... आपण अमुक एका गाण्यावर कपल डान्स करू... अशी हटके एंट्री करू... असे संवाद दोघांच्यात सुरु होऊन प्लॅनिंग चालू होत. मग नवरा काय 'जोरू का गुलाम बनके रहुंगा' या गाण्याच्या ओळींप्रमाणे आपण तिचे गुलाम असल्यासारखे ती जे सांगेल ते सार काही करायला तयार होतात. अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बघुयात हा व्हिडीओ... आणि या जोरूने आपल्या बायकोसाठी काय सरप्राइज दिले.... ते सरप्राइज पाहून त्याच्या बायकोने केले... पाहा व्हायरल व्हिडीओ...(Groom Made A Live Painting Of His Wife At Their Wedding).

नक्की या नवऱ्याने काय सरप्राइज दिल ते पाहू... 

हा व्हायरल व्हिडीओ आहे वरुण जरसानिया आणि प्रथा वडारिया या गुजराती जोडप्याचा. varun.jarsaniaandpratha_vadaria या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला वरुण, अमेरिकन पॉप रॉक बँड मरून ५ (Maroon 5) यांनी गायलेल्या 'गर्ल्स लाईक यु' या गाण्यावर नाचत एंट्री करताना दिसतो आहे. त्याच्या मागे एक मोठा कॅनव्हास व काही रंग  ठेवले आहेत. नाचत दमदार एंट्री केल्यानंतर वरुण कॅनव्हासवर काही रेघोट्या ओढून चित्र काढायला सुरुवात करतो. चित्र काढता काढता तो प्रथाकडे इशारे करून नाचत देखील आहे. आपल्या नवऱ्याला आपल्यासाठी चित्र काढताना बघून प्रथाचा चेहरा अधिकच खुलला आहे. तो आपल्यासाठी काय सरप्राईज देणार याची उत्सुकता तिच्या चेहेऱ्यावर दिसत आहे. हळूहळू हा मास्टरपीस आकार घेऊ लागतो. नक्की या कॅनव्हासवर कसलं चित्र आहे हे बघण्यासाठी सारेच आतुर आहेत. वरुणने चक्क आपल्या बायको म्हणजेच प्रथाचे  चित्र त्या कॅनव्हासवर रेखाटले होते. यात पण त्याने एक ट्विस्ट ठेवला होता. त्याने चित्र काढताना ते उलटे रेखाटले होते. चित्र काढून झाल्यावर त्याने तो कॅनव्हास उचलून उलटा फिरवला तेव्हा सगळ्यांना लक्षात आले की याने आपल्या बायकोचे चित्र काढले आहे. नवऱ्याने आपले पोर्ट्रेट प्रकारातील चित्र काढले हे पाहून प्रथा खूप खुश होते व आपल्या बाजूला बसलेल्या वडिलांना ती हे चित्र उत्साहाने दाखवत आहे.      

कॅप्शनमध्ये काय म्हटले आहे... 

'नवऱ्याने आपल्या बायकोसाठी डान्स करणे हे आता खूपच कॉमन झाले आहे... हे बघा काहीतरी वेगळ'... माझ्या नवरीसाठी आणि होणाऱ्या बायकोसाठी खूप प्रेम...अशी कॅप्शन देत वरुणने हा व्हिडीओ शेअर केला आहे.   

नेटकरी काय म्हणत आहेत... 

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मिलियन्स नेटकऱ्यांनी पाहून कमेंट्स आणि लाईक्सच्या स्वरूपात या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'किती भाग्यवान आहे ही मुलगी', 'अमेझिंग' अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 'भविष्यात माझ्या होणाऱ्या लग्नाबद्दल मी खूप उत्साहीत झालो आहे...मला ही आयडिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ... तुमच्या दोघांचे अभिनंदन' अशी कमेंट एका युजरने केली आहे. कमेंट्स सोबतच हार्ट्स इमोजीचा वापर करून नेटकऱ्यांनी या जोडप्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल