Join us

सतत भांडी घासायचा कंटाळा येतो? ५ सोप्या स्टेप्स, ५ मिनीटांत भांडी होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2023 15:06 IST

How To Wash Utensils at Home Easy Tips : पाहूया झटपट भांडी घासण्याची एक सोपी ट्रिक...

ठळक मुद्देभांडी बराच वेळ तशीच पडून राहीली तर झटपट घासायची सोपी ट्रिकथकल्यावर भांडी घासायचा कंटाळा आला असेल तर...

भांडी घासायची हे घरातील एक महत्त्वाचं काम असतं. अनेकदा आपल्याला या कामाचा फार कंटाळा येतो पण ते काम केल्यावाचून पर्याय नसतो. सकाळी उठल्यापासून चहा, ब्रेकफास्ट, जेवण असं सगळं करता करता किती भांडी साठत जातात हे आपल्या लक्षातही येत नाही. मात्र ती घासायची म्हटलं की आपल्याला फार कंटाळा येतो. थंडीच्या दिवसांत तर गार पाण्यात हात घालायलाही नको होतं. पण घर म्हटल्यावर भांडी पडणारच आणि ती घासावीही लागणारच. काही वेळा हे काम अजिबात करु नये असं वाटत असलं तरी शेवटी ते आपल्यालाच करावं लागतं. हीच भांडी फारशी न घासताही आणि झटपट साफ झाली तर? आज आपण अशीच भांडी घासण्याची एक सोपी ट्रिक पाहणार आहोत (How To Wash Utensils at Home Easy Tips). 

१. बेसिनमध्ये भांडी साठून राहीली आणि त्यातून काही वेळाने वास यायला लागला असं कधी ना कधी आपल्यापैकी अनेकांकडे होतं. मात्र अशावेळी जास्त चिंता करायची आवश्यकता नाही. 

२. यावर एक सोपा उपाय म्हणजे सगळ्यात आधी बेसिन लॉक करायचे. या सगळ्या भांड्यांवर भरपूर बेकिंग सोडा घालायचा. २ कप व्हिनेगर घालायचे. 

३. यावर १ कप हायड्रोजन पॅरॉक्साईड घालायचे आणि लिंबाचे तुकडे करुन तेही या भांड्यांमध्ये घालायचे. 

४. पाण्याचा नळ सोडायचा म्हणजे हे सगळे मिश्रण पाण्यात मिसळून भांड्यांना लागण्यास मदत होईल. 

५. त्यानंतर बेसिन पुन्हा सुरू करायचे आणि एक एक भांडे या पाण्यातून काढून फक्त विसळायचे. भांडी फारशी न घासताही चांगली साफ होतात. 

टॅग्स :सोशल व्हायरल