दिवाळी म्हटलं की सगळीकडे उत्साह आणि आनंदाचा काळ असतो. नव्या कपड्यांची, दागिन्यांची आणि साड्यांची खरेदी केली जाते.(Diwali saree care) त्यात सिल्कची साडी ही अनेक महिलांच्या आवडीची. अगदी सहज आणि पटकन नेसता येणारी.(how to wash silk saree at home) अगदी कोणत्याही सणसमारंभात किंवा ऋतूमध्ये सहज ही साडी कॅरी करता येते.(silk saree care) पण अनेकदा खाताना तेलाचे किंवा सॉसचे डाग यावर पडतात.
दिवाळीत आपल्यापैकी अनेकजण सिल्कची साडी नेसणार असाल पण साड्या धुताना जर थोडं दुर्लक्ष झालं, तर तिचा रंग फिका होतो, कापड नाजूक असतो आणि ती साडी पुन्हा कधीच पूर्वीसारखी दिसत नाही.(silk saree washing tips) मग प्रश्न असा सिल्कची साडी धुताना नेमकं काय काळजी घ्यावी? या काही सोप्या टिप्स पाहा.
व्हाट झुमका!! दिवाळीत शोभून दिसतील 'असे' झुमक्याचे ५ पॅटर्न, साध्या लूकवरही दिसाल सुंदर
1. सिल्कची साडी किंवा ड्रेस कधीही मशीनमध्ये धुवू नका. नेहमी हाताने धुवायला हवे. यासाठी बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट किंवा व्हिनेगर घाला. नंतर काही मिनिटे कपडे भिजवा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. सिल्कच्या साडीला घासणे टाळा.
2. सिल्कची साडी धुण्यासाठी PH-संतुलित डिटर्जंटचा वापर करा. ब्लीच किंवा रसायने असलेले डिटर्जंट वापरु नका. एंजाइम असलेले रसायन कपड्यांचे नुकसान करते. गरम पाण्यामुळे सिल्कच्या साडीचे नुकसान होऊ शकते.
3. सिल्कची साडी कधीही उन्हात वाळवू नका. यामुळे त्याचा रंग फिकट होतो. कापड कमकुवत होऊ शकतो. त्यासाठी नेहमी हवेखाली सुकवण्याचा प्रयत्न करा. साडीला इस्त्री करु नका. सुती कापड ठेवा.
4. सिल्कची साडी वर्षानुवर्ष तशीच राहावी यासाठी तिला सुती कापड किंवा मलमलच्या पिशवीत ठेवा. प्लास्टिकचे कव्हर वापरणे टाळा. हवेच्या प्रक्रियेत आल्याने कापड पिवळे होऊ शकते. दर ३-४ महिन्यांनी साडी तपासा. एकाच जागी घडी करुन ठेवल्याने ती चिकटते आणि डाग लागतात.