Join us

पूजेतील झेंडूची फुलं- पाने कचऱ्यात न टाकता करा 'असा' उपयोग – धूपाचा सुवास दरवळेल घरभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2025 14:21 IST

Homemade herbal dhoop sticks for pooja: Homemade dhoop sticks: Natural dhoop sticks: निर्माल्य समजून फेकून देण्याऱ्या झेंडूच्या फुलांपासून आपण सुगंधीत धूप घरी कसा तयार करायचा पाहूया.

सण- समारंभ, नवरात्र, दसऱ्याच्या काळात किंवा नित्यनियमाने देवपूजा केली जाते. दसरा आणि नवरात्रमध्ये देवीला झेंडूची फूल अर्पण केली जातात.(marigold flowers uses) दसऱ्याच्या दिवशी दाराला झेंडूच्या पानांचे तोरण लावले जाते. यादिवशी प्रियजनांना आपट्याचे पान देखील सोनं म्हणून दिले जाते. पण दुसऱ्या दिवशी झेंडूची फुले, पाने सुकतात.(Homemade herbal dhoop sticks for pooja) अशावेळी आपण निर्माल्य म्हणून सगळ्या गोष्टी फेकून देतो. पण निर्माल्य समजून फेकून देण्याऱ्या गोष्टींपासून आपण सुगंधीत धूप घरीच तयार करु शकतो.(Homemade dhoop sticks) झेंडूचं फूल हे देवघरातच नाही तर त्याचा औषधी आणि सुगंधित गुणधर्म देखील आहे. यापासून तयार केलेला धूप किंवा अगरबत्ती घरातील वातावरण शुद्ध करत नाही तर नकारात्मकत ऊर्जा देखील कमी करण्यास मदत करते. (Organic incense sticks)शिवाय झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये असलेला सुगंध बराच काळ टिकतो. त्यामुळे हा धूप जाळल्यानंतर त्याचा सुवास घरभर दरवळतो.(Eco-friendly dhoop sticks) हा धूप तयार करताना आपल्याला केमिकल्स वापरण्याची गरज नाही. यात असणारे घटक नैसर्गिक असल्यामुळे पर्यावरणाला हानी देखील पोहोचणार नाही. पाहूयात हा धूप घरी कसा बनवायचा. 

Suran Fries : पावसाळ्यात खा गरमगरम कुरकुरीत सुरणाचे फ्राइज – चवही मस्त आणि करायला अगदी सोपे

धूप बनवण्यासाठी आपल्याला ७ ते ८ झेंडूची फुले, ४ ते ५ कापूर , सुकलेली आंब्याची- आपट्याची पाने, गुलाबाची फुले, २ ते ३ तमालपत्र , ६ ते ७ लवंगा, दालचिनीच्या काड्या, २ चमचे चंदन पावडर, १ चमचा मध, २ चमचे तूप आणि पाणी. इत्यादी साहित्याची गरज लागेल. 

1. सगळ्यात आधी आपल्याला झेंडूची फुले व्यवस्थित तोडावी लागतील. नंतर सर्व मध, तूप आणि पाणी सोडून इतर सर्व साहित्य उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्या. एकदम व्यवस्थित वाळल्यानंतर मिक्सच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. याची पावडर तयार होईल. चाळणीच्या साहाय्याने आपल्याला ही पावडर गाळून घ्यायची आहे. जाड राहिलेली पावडर पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करुन चाळून घ्या. 

2. आता एका प्लेटमध्ये भुसा तयार होईल. यात तूप, मध आणि थोडे पाणी घालून मिक्स करा. हवं असल्यास यात आपण तीळाचे तेल देखील घालू शकतो. याचा गोळा तयार करा. नंतर याचे हव्या त्या आकारात धूप बनवा. पुन्हा उन्हात व्यवस्थित वाळवून घ्या. तयार होईल कमी खर्चातील सुगंधित धूप घरच्या घरी. पूजेत किंवा घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी याचा वापर करु शकतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Repurpose marigold flowers from pooja; create fragrant, homemade incense sticks.

Web Summary : Don't discard pooja flowers! Create fragrant incense using marigold, camphor, and spices. This eco-friendly dhoop purifies the air, reduces negativity, and fills your home with a lasting, natural fragrance. The simple recipe avoids chemicals and uses readily available ingredients.
टॅग्स :सोशल व्हायरल