Lokmat Sakhi >Social Viral > देसी जुगाड! एक्सपायरी डेट उलटलेल्या गोळ्यांचं काय कराल? पांढरे कपडे धुण्याचा भन्नाट उपाय 

देसी जुगाड! एक्सपायरी डेट उलटलेल्या गोळ्यांचं काय कराल? पांढरे कपडे धुण्याचा भन्नाट उपाय 

Viral Trick For Washing White Clothes: पांढऱ्या कपड्यांवर पिवळट झाक आली असेल तर ती घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहाच..(use of expire medicine tablets to wash white clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 17:52 IST2025-08-12T09:23:32+5:302025-08-12T17:52:44+5:30

Viral Trick For Washing White Clothes: पांढऱ्या कपड्यांवर पिवळट झाक आली असेल तर ती घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहाच..(use of expire medicine tablets to wash white clothes)

how to use expire medicine tablets to wash white clothes | देसी जुगाड! एक्सपायरी डेट उलटलेल्या गोळ्यांचं काय कराल? पांढरे कपडे धुण्याचा भन्नाट उपाय 

देसी जुगाड! एक्सपायरी डेट उलटलेल्या गोळ्यांचं काय कराल? पांढरे कपडे धुण्याचा भन्नाट उपाय 

Highlightsएक्सपायरी झालेल्या औषधी गोळ्या बाहेर काढा आणि पुढे सांगितलेल्या पद्धतीने पांढरे कपडे धुवून पाहा..

पांढरे कपडे अंगात असतील तर आपला लूक आपोआपच खूप स्मार्ट आकर्षक होतो. त्यामुळे बरेच जण ऑफिसमध्ये घालण्यासाठी पांढऱ्या कपड्यांची निवड करतात. बहुतांश मुलांनाही शाळेमध्ये दोन दिवस पांढऱ्या रंगाचा गणवेश घालून जावं लागतं. त्यांचे पांढरे कपडे तर खूप मळतात. याशिवाय पांढरे कपडे वापरताना आणखी एक अडचण अशी येते की हे कपडे काही दिवसातच पिवळे पडायला लागतात. त्यांच्यावरचा पिवळटपणा कमी करताना मग आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हालाही पांढरे कपडे धुताना वैताग येत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा (Viral Trick For Washing White Clothes). घरातल्या एक्सपायरी झालेल्या औषधी गोळ्या बाहेर काढा आणि पुढे सांगितलेल्या पद्धतीने पांढरे कपडे धुवून पाहा..(use of expire medicine tablets to wash white clothes)

 

एक्सपायरी झालेल्या औषधी गोळ्यांनी पांढरे कपडे कसे धुवायचे?

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक्सपायरी झालेल्या औषधी गोळ्या एकत्र करा. आता साधारण अर्धी बादली एवढे गरम पाणी घ्या.

५ मिनिटे का असेना पण मुलांना रोज डोळे मिटून शांत बसायला लावा! मिळतील ६ जबरदस्त फायदे..

औषधी गोळ्या बत्त्याने कुटून त्याची पावडर करून घ्या. साधारण १ शर्ट धुवायचा असेल तर त्यासाठी ३ ते ४ औषधी गोळ्या वापराव्या. आता गोळ्यांची पावडर गरम पाण्यात टाका. त्यासोबतच त्यात थोडे मीठही घाला. गोळ्यांची पावडर आणि मीठ पाण्यात पुर्णपणे विरघळल्यानंतर त्यात पांढरे कपडे भिजत घाला.

 

साधारण अर्धा तास हे कपडे पाण्यामध्ये तसेच राहू द्या. त्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढा आणि कपड्याच्या ब्रशने घासून घ्या. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल आणि पांढऱ्या कपड्यांवरचा पिवळट रंग जाऊन ते छान शुभ्र पांढरे झालेले दिसतील. 

फॅटी लिव्हरचा त्रास? ५ पदार्थ खा- विषारी पदार्थ बाहेर पडून शरीर हाेईल डिटॉक्स, दुखणं थांबेल

या पद्धतीने तुम्ही वॉशिंग मशिनमध्येही पांढरे कपडे धुवू शकता. हा उपाय shobhahairstyal या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 


 

Web Title: how to use expire medicine tablets to wash white clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.