Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगून गच्चं झाले? ३ घरगुती उपाय, दरवाजे उघडतील चटकन

पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगून गच्चं झाले? ३ घरगुती उपाय, दरवाजे उघडतील चटकन

How to Fix Swollen Wooden Door: पावसाळ्यात लाकडी दरवाजे, खिडक्या फुगून पक्क्या होऊन जातात. असं झालं असेल तर त्या घरच्याघरी दुरुस्त करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.(how to take care of wooden furniture in rainy season?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 09:30 IST2025-06-19T09:25:12+5:302025-06-19T09:30:01+5:30

How to Fix Swollen Wooden Door: पावसाळ्यात लाकडी दरवाजे, खिडक्या फुगून पक्क्या होऊन जातात. असं झालं असेल तर त्या घरच्याघरी दुरुस्त करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.(how to take care of wooden furniture in rainy season?)

how to take care of wooden furniture in rainy season, How to Fix Swollen Wooden Door | पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगून गच्चं झाले? ३ घरगुती उपाय, दरवाजे उघडतील चटकन

पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगून गच्चं झाले? ३ घरगुती उपाय, दरवाजे उघडतील चटकन

Highlightsपावसामुळे तुमच्या घरातले दरवाजे, खिडक्याही फुगून पक्के झाले असतील तर हे काही सोपे उपाय करून पाहा.

पावसाळा सुरू झाला आणि पावसाचा जोर वाढू लागला की त्याच्या पाठोपाठ घरातल्या एकेक अडचणी समोर येऊ लागतात. उदारहण द्यायचेच झाले तर पाणी लागून किंवा भिंतींमधली ओल मुरून लाकडी दरवाजे आणि खिडक्या फुगतात. ही एक मोठीच त्रासदायक समस्या असते. कारण दरवाजे फुगल्यामुळे त्यांचं आकारमान वाढतं आणि त्यांच्या चौकटीमध्ये ते व्यवस्थित बसत नाहीत. एरवी अगदी सहज लागणारा, उघडणारा दरवाजा अगदी पक्का होऊन जातो. जोर लावून, ढकलून तो लावावा आणि उघडावा लागतो. बऱ्याचदा तर दरवाज्यातून येणारा करकर आवाजही नकोसा होऊन जाताे (How to Fix Swollen Wooden Door?). अशा पद्धतीने पावसामुळे तुमच्या घरातले दरवाजे, खिडक्याही फुगून पक्के झाले असतील तर हे काही सोपे उपाय करून पाहा.(how to take care of wooden furniture in rainy season?)

 

पावसामुळे लाकडी दरवाजे, खिडक्या गच्चं झाल्या असतील तर काय करावे?

१. जर पावसामुळे दरवाजे, खिडक्या गच्चं झाल्या असतील तर सॅण्ड पेपर घेऊन दरवाजांच्या कडा थोड्याशा घासणे हा एक पर्याय होऊ शकतो. यामुळे दरवाजांचा फुगीरपणा कमी होऊन ते लवकर लागतील.

नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर..

२. ऑलिव्ह ऑईलच्या मदतीनेही फुगलेले दरवाजे व्यवस्थित लागले जाऊ शकतात. हा उपाय करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल घ्या आणि ते दरवाजांच्या तिन्ही कडांवर लावून तो भाग घासून काढा. 

 

३. ज्या दरवाजांना पावसाळ्यात थेट पाऊस लागतो किंवा जे दरवाजे, खिडक्या पाऊस न लागताही दरवेळी पावसाळ्यात जाम होऊन जातात अशा दरवाजांना पावसाळा सुरू होण्यापुर्वी एकदा पॉलिशिंग करावं. घरच्याघरी दरवाजांना पॉलिशिंग करणं अगदी सोपं आहे. पॉलिशिंग केल्यामुळेही दरवाजे फुगत नाहीत.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहितीच पाहिजेत 'या' गोष्टी, पोषण मिळेल भरपूर- स्वयंपाक होईल चवदार

४. दरवाजांचा जो भाग चौकटीला जोडलेला असतो त्या बिजागिरींवर नियमितपणे तेल सोडा. यामुळे दरवाजातून येणारा करकर आवाज कमी होईल. 

 

Web Title: how to take care of wooden furniture in rainy season, How to Fix Swollen Wooden Door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.