आता लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत तसेच संक्रांत, दिवाळी, दसरा अशा मोठ्या सणांच्या निमित्ताने सिल्कच्या साड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. कितीही महागडी साडी असली तरी ती आपण काही निमित्तानेच घालतो आणि नंतर ती घडी करून कपाटात ठेवून देतो. नुकतीच नेसलेली साडी सहसा रिपिट केली जात नाही. त्यामुळे मग या साडीचा पुन्हा नंबर येईपर्यंत मध्ये बराच वेळ निघून जातो. यामध्ये मग असं लक्षात येतं की हळूहळू अशा ठेवणीतल्या सिल्कच्या काठपदर साड्या घड्यांवर चिरल्या जातात. असं तुमच्याही एखाद्या साडीच्या बाबतीत झालं असेल तर नेमकी काय चूक होते आहे ते पाहून घ्या (How to Take Care of Silk Saree?).. पुढे सांगितलेल्या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमची साडी वर्षांनुवर्षे खराब होणार नाही.(home hacks to keep silk saree always fresh and shiny)
सिल्कच्या साड्या घडीवर का चिरल्या जातात?
१. बहुतांश महिला सिल्कच्या साड्यांची घडी घालतात. ती व्यवस्थित साडीच्या बॉक्समध्ये घालतात आणि मग कपाटात ठेवतात. इथपर्यंत तर सगळं ठिक आहे.
कपड्यांवर तेलाचे डाग पडले? चिमूटभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय- डाग कुठे होता कळणारही नाही
पण चूक तेव्हा हाेते जेव्हा साड्या एकावर एक रचून ठेवल्या जातात. साड्या एकावर एक रचल्या की सगळ्यात खाली असणाऱ्या साडीवर खूप ओझं होतं आणि ते तिला एका ठराविक काळानंतर पेलवत नाही. त्या ओझ्यामुळे मग ती साडी चिरली जाते. त्यामुळे एकावर एक या पद्धतीने साड्यांचा ढिग लावून ठेवू नका. एका साडीवर जास्तीतजास्त ४ ते ५ साड्याच ठेवा.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की २ ते ३ महिन्यांनंतर ठेवणीतल्या साड्यांची थोडी थोडी जागा बदला. म्हणजेच वरची साडी खाली, खालची साडी वर अशा पद्धतीने साड्यांची अदलाबदल करत राहा. यामुळे एकाच साडीवर खूप दिवस जास्त ओझं पडणार नाही.
Winter Care: सर्दीमुळे घसा दुखतोय- आवाज बसला? सोपा घरगुती उपाय- काही मिनिटांत आराम मिळेल
३. साड्या जिथे ठेवल्या असतील त्या ठिकाणी कडुलिंबाची पाने, मॉईश्चर शोषून घेणारे सॅचेट ठेवा. यामुळे साड्या ज्या कप्प्यामध्ये ठेवल्या आहेत, तो कप्पा ओलसर, कुबट, दमट राहणार नाही. कारण अशा वातावरणातही साड्या लवकर चिरू शकतात.
