Join us

जुनी सिल्कची साडीही दिसेल नुकतीच दुकानातून आणल्यासारखी चमकदार, ५ टिप्स-सिल्कच्या साड्या वर्षानूवर्षे नव्याकोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2025 16:08 IST

How to Take Care of Silk Saree: सिल्क साड्यांची चमक वर्षांनुवर्षे टिकून राहावी म्हणून तिची कशी काळजी घ्यायची ते पाहूया..(5 tips to store your expensive silk saree)

ठळक मुद्देसिल्कच्या साड्यांच्या आजुबाजुला कडुलिंबाची पाने ठेवू शकता. त्यामुळे मॉईश्चर शाेषून घेतलं जाऊ शकतं. किंवा मग तांदूळ, लवंग, दालचिनी यांची एक पुरचुंडी बांधून ती ठेवू शकता.

भरपूर पैसे खर्च करून आपण सिल्क साड्या अगदी हौशीने विकत घेतो. सणासुदीला त्या नेसताे.. पण दोन ते तीन वर्षांनी असं दिसून येतं की त्या साड्यांवरची चमक आता कमी झाली असून त्या थोड्या डल पडत चालल्या आहेत. साडीचे काठसुद्धा काळसर किंवा चमक गेल्यासारखे दिसत आहेत. अशा साड्या मग रोलप्रेस किंवा ड्रायक्लिन करून आणल्या तरी जुन्याच दिसायला लागतात. असं होण्यामागचं कारण म्हणजे आपण साडीची काळजी घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत (5 tips to store your expensive silk saree). सिल्कच्या महागड्या साड्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्या वर्षांनुवर्षे नव्यासारख्या दिसतील (how to maintain shine on silk saree?), त्यांची चमक कमी होणार नाही म्हणून काय करायचं ते पाहूया...(how to take care of silk saree?)

 

सिल्कच्या साड्यांची काळजी कशी घ्यायची?

१. सिल्कच्या साड्यांच्या बाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट अशी की ती साडी नेसल्यानंतर धुवायलाच पाहिजे किंवा ड्रायक्लिन करून आणायलाच पाहिजे असं नाही. साडी नेसून झाल्यानंतर ती बेडवर मोकळी पसरवून ठेवा. अगदी १ ते दिड तास ती पंख्याखाली तशीच राहू द्या आणि त्यानंतर मग ती घडी घालून ठेवा.

गौरी गणपतीसाठी घर आवरायचंय; पण वेळच नाही? ५ टिप्स- अवघ्या काही तासांतच घर होईल चकाचक 

२. सिल्कच्या साड्यांना वारंवार रोलप्रेस करणं टाळा. स्टीम आयर्न करणंही टाळा. त्या साड्यांना घरच्याघरी अगदी साधी इस्त्री करा.

३. सिल्कच्या साड्या कधीही प्लास्टिकच्या साडी कव्हरमध्ये ठेवू नका. त्याऐवजी एखादा सुती कपडा वापरा. त्या कपड्यामध्ये सिल्कची साडी गुंडाळा आणि मग ती कपाटात ठेवा.

 

४. सिल्कच्या साड्या एकावर एक अशा भरपूर रचून ठेवू नका. एका साडीवर जास्तीतजास्त ३ ते ४ साड्या पुरे आहेत. त्यासाठी मग तुम्ही साडी ठेवायला बॉक्स घेऊ शकता. एका बॉक्समध्ये ३ ते ४ साड्या अशा पद्धतीने त्या रचून ठेवू शकता.

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी जितकी खास तितकंच ब्लाऊजही हवं झकास, पैठणीवर शोभते ‘असे’ ब्लाऊज, पाहा सुंदर पॅटर्न

५. सिल्कच्या साड्यांच्या आजुबाजुला कडुलिंबाची पाने ठेवू शकता. त्यामुळे मॉईश्चर शाेषून घेतलं जाऊ शकतं. किंवा मग तांदूळ, लवंग, दालचिनी यांची एक पुरचुंडी बांधून ती ठेवू शकता. यामुळे कुबट वास येणार नाही. डांबराची गोळी ठेवणं टाळा. कारण ती जर साडीच्या थेट संपर्कात आली तर साडीवर डाग पडू शकतात.ही माहिती 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसाडी नेसणे