ब्रा, स्लीप असे इनरवेअर अगदी रोजच्या रोज वापरले आणि धुतले जातात. त्यामुळे तुम्ही ते कितीही चांगल्या दर्जाचे घेतले तरी काही दिवसांतच त्यांचे बेल्ट सैलसर व्हायला लागतात. काही ब्रा चे सैल झालेले बेल्ट ॲडजस्ट करायला तिथे हूक असतात. पण स्पोर्ट्स ब्रा किंवा स्लीपला अशी ॲडजस्टमेंटची सोय नसते. त्यामुळे जेव्हा बेल्ट खूप सैलसर होऊन जातात तेव्हा ते खांद्यावरून खाली ओघळून येतात. बऱ्याचदा तर असंही होतं की ड्रेसच्या बाह्या जर लहान असतील तर त्या बाह्यांच्याही खाली ब्रा चा बेल्ट येतो आणि चारचौघांत खूप अवघडल्यासारखं होऊन जातं. त्यामुळेच सैल झालेले बेल्ट अगदी परफेक्ट मापाचे करण्यासाठी हे काही उपाय पाहून घ्या.(How to stop your bra straps from falling?)
ब्रा किंवा स्लीपचे सैल झालेले बेल्ट कसे मापाचे करावे?
सैलसर झालेले ब्रा चे बेल्ट अगदी एका मिनिटांत परफेक्ट मापाचे कसे करावे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ designer_sadhna या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
अनेकदा काही जणी बेल्ट फक्त सैल झाला म्हणून ब्रा, स्लीप वापरणं सोडून देतात. त्यामुळे बरेच पैसे वाया जातात. हे टाळण्यासाठी ही ट्रिक खूप जास्त उपयोगी ठरणारी आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुई आणि दोरा लागणार आहे. बेल्ट स्लीपला जिथे जोडलेला असतो तिथे पुढच्या बाजुने किंवा मागच्या बाजुने तुम्ही हा उपाय करू शकता.
यासाठी सुईने एकदा बेल्टच्या उजव्या बाजुने तर एकदा डाव्या बाजुने याप्रमाणे टिपा मारून घ्या. तुमचा बेल्ट जेवढा सैल असेल तेवढ्या जास्त टिपा माराव्या लागतील.
वाढलेलं कोलेस्टेरॉल लवकर कमी करणारे ४ सुपरफूड! रोज खा- कोलेस्टेरॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये
टिपा मारून झाल्यानंतर बेल्ट जवळ ओढून घ्या आणि दोऱ्याची गाठ मारून अतिरिक्त दोरा कापून घ्या. यामुळे अगदी डिझाईन केल्याप्रमाणे बेल्ट छान छोटा होईल आणि वारंवार खांद्यावरून ओघळणारही नाही.