घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी रोजच्या दिनचर्येत निर्माण होणारा कचऱ्याची समस्या आपल्याला टाळता येत नाही. (Cleaning Hacks)स्वयंपाकघरातील भाजीपाला, फळांची सालं, पॅकेजिंक मटेरियल, कागद आणि प्लास्टिक अशा विविध प्रकारचा कचरा घरातून रोज निघतो. (Wet waste smell solution)हा कचरा एका ठिकाणी जमा करण्यासाठी घरात कचऱ्याचा डबा महत्त्वाचा असतो. (How to clean dustbin)
आपल्या घरात रोज मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा तयार होतो. स्वयंपाकघर किंवा बाथरुम अशा ठिकाणी कचऱ्याचा डबा पाहायला मिळतो. (Garbage bin cleaning hacks) हा डबा स्वच्छ न ठेवल्यास त्यातून वास येऊ लागतो, किडे- मुंग्या होतात आणि घरात अस्वच्छता पसरते. त्यामुळे घरातील इतर वस्तूंप्रमाणे कचऱ्याच्या डब्याची स्वच्छता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. घरातील कचऱ्याचा डबा साफ करण्यासाठी ५ टिप्स वापरा. (Waste management at home)
1. कचऱ्याचा डबा रोज रिकामा करताना फक्त धुऊन न घेता साबण किंवा डिटर्जंट पावडरने नीट धुवा. यामुळे डब्यातील जंतू व वास कमी होतो. स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या डब्यातून घाव वास येऊ लागतो. ओला आणि सुका कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. अशावेळी आपण सुगंधीत तेलाची मदत घेऊ शकतो. कापसावर आवश्यक तेल लावा आणि ते डस्टबिनमध्ये ठेवा. यामुळे वास नाहीसा होईल आणि स्वयंपाकघरात सुगंध येऊ लागेल.
2. डब्यातून सारखा घाण वास येत असेल तर त्यात बेकिंग सोडा शिंपडा. आठवड्यातून किमान एकदा तरी व्हिनेगर आणि गरम पाण्याने डबा धुतल्यास डाग आणि बॅक्टेरिया नष्ट होतील.
3. डब्यातील कचरा हा थेट न टाकता त्यासाठी पॉलिथिन बॅग किंवा डस्टबिन लाईनर वापरा. त्यामुळे डब्याला चिकटलेले अन्नाचे कण, तेलकटपणा किंवा ओलसरपणा कमी होतो आणि साफ करण्यासह सोपे जाते.
4. कचऱ्याचा डबा धुतल्यानंतर तो घरात पुन्हा ठेवण्याआधी उन्हात वाळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जंतू मरतात, ओलसरपणा कमी होतो आणि दुर्गंधी देखील नाहीशी होते. कचऱ्याच्या डब्याला झाकण असल्यास वास येत नाही. झाकण दरवेळी नीट बंद करा आणि आठवड्यातून एकदा झाकणही धुवा.