भारतीय घरात रोज ताटात चपाती वाढली जाते. चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. पण चपाती बनवणं काही महिलांसाठी अवघड काम असतं तर काहीसाठी सोपं. अनेकदा आपल्या काही छोट्या चुकांमुळे चपाती बनताना तुटते किंवा व्यवस्थित भाजली जात नाही.(rolling pin sticky problem) जर पीठ व्यवस्थित मळले असूनही चपाती फुगत नसेल तर आपण लाटणं कशा पद्धतीने वापरतो. याकडे लक्ष द्यायाला हवे. (how to clean rolling pin quickly) आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक भांडी आहेत. ज्याचा आपण रोज वापर करतो. त्यातील एक लाटणं आणि पोळपाट.
पण पोळी लाटल्यानंतर अनेकदा लाटण्याला कोरडे किंवा ओले पीठ चिकटून राहाते. जर ते लगेच साफ केले नाही तर सुकून पीठ क़डक होते.(rolling pin hacks for smooth dough) ज्यामुळे पुन्हा चपाती लाटताना ती व्यवस्थित लाटली जात नाही.(how to make perfect rotis) ही समस्या जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात पाहायला मिळते. पीठ चिकटल्यामुळे लाटणं घाण होतं, पोळी नीट लाटता येत नाही, शिवाय चिकटलेले पीठ काढण्यात आपला वेळही वाया जातो.(kitchen tips for rolling pin)
बाथरुमच्या फरशी-टाइल्सवर काळा- पिवळा थर जमा झाला? ५ रुपयांत डाग होतील कमी- फरशी चमकेल चकाक
लाटणं नीट स्वच्छ असेल तर चपाती मस्त फुलते आणि खायलाही मऊ लागते. त्यामुळे लाटणं स्वच्छ ठेवणं ही फक्त स्वच्छतेची गोष्ट नसून चपातीच्या बनवण्याशी थेट संबंधित आहे. जर आपल्याही स्वयंपाकघरातील लाटणं कायम घाण होत असेल तर या २ ट्रिक्स वापरा. लाटणं मिनिटांत स्वच्छ होईल आणि पीठ चिकटण्याची समस्या कायमची दूर होईल.
लाटण्यावर चिकटलेले ओले पीठ काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. यासाठी आपल्याला एका भांड्यात कोमट पाणी घ्यावे लागेल. यामध्ये डिटर्जंट आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा. लाटणे काही मिनिटे पाण्यात राहू द्या. काही वेळाने बाहेर काढून मऊ स्क्रबने घासून स्वच्छ करा. जर पीठ खूप जास्त चिकटले असेल तर हाताने देखील लाटणं स्वच्छ करु शकता.
लाटण्यावर अडकलेले पीठ काढण्यासाठी आपण मिठाच्या पाण्याचा वापर करु शकतो. यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्या. त्यात मीठ घालून ते विरघळवा. नंतर त्यात लाटणं १ मिनिट भिजवून स्क्रबरच्या मदतीने घासून स्वच्छ करा.