Lokmat Sakhi >Social Viral > कॉटनच्या साड्यांची मऊमऊ गोधडी शिवायची आहे, अगदी आजी मायेनं शिवायची तशी? ‘ही’ पाहा ट्रिक

कॉटनच्या साड्यांची मऊमऊ गोधडी शिवायची आहे, अगदी आजी मायेनं शिवायची तशी? ‘ही’ पाहा ट्रिक

How To Stitch Godhadi From Old Saree Without Using Stitching Machine?: शिलाई मशिन न वापरता घरच्याघरी आई- आजीच्या जुन्या साड्यांची गोधडी खूप सोप्या पद्धतीने शिवता येते..(simple tips for stitching godhadi at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 19:54 IST2025-03-03T14:27:37+5:302025-03-04T19:54:18+5:30

How To Stitch Godhadi From Old Saree Without Using Stitching Machine?: शिलाई मशिन न वापरता घरच्याघरी आई- आजीच्या जुन्या साड्यांची गोधडी खूप सोप्या पद्धतीने शिवता येते..(simple tips for stitching godhadi at home)

how to stitch godhadi from old saree without using stitching machine, simple tips for stitching godhadi at home | कॉटनच्या साड्यांची मऊमऊ गोधडी शिवायची आहे, अगदी आजी मायेनं शिवायची तशी? ‘ही’ पाहा ट्रिक

कॉटनच्या साड्यांची मऊमऊ गोधडी शिवायची आहे, अगदी आजी मायेनं शिवायची तशी? ‘ही’ पाहा ट्रिक

Highlightsगोधडी शिवण्याची ही पद्धत एवढी सोपी आहे की तिच्यासाठी शिलाई मशिन वापरण्याचीही गरज नाही.

गोधडी.. नाव थोडं वेडंवाकडं असलं तरी त्या पांघरुणात प्रचंड माया, प्रेम सामावलेलं असतं.. आई- आजीच्या जुन्या कॉटनच्या साड्यांपासून तयार केलेली गोधडी जेव्हा कुडकुडणाऱ्या थंडीत अंगावर ओढली जाते तेव्हा आपसूकच त्यातून मायेची उब मिळते. पुर्वी घरोघरी गोधड्या असायच्या. पण आता मात्र क्वचित कुठेतरी गोधडी पाहायला मिळते. त्यात पुर्वी गोधड्या शिवून देणारे लोक गल्लोगल्ली फिरताना दिसायचे. त्यांच्याकडून सहज गोधड्या शिवून घेतल्या जायच्या. पण आता मात्र ते लोक दिसत नाहीत त्यामुळे मग घरात जुन्या साड्या असूनही त्यांच्या गोधड्या तयार करता येत नाहीत. म्हणूनच आता आपली आपणच घरच्याघरी कशी गोधडी शिवायची ते पाहूया..(How To Stitch Godhadi From Old Saree Without Using Stitching Machine?) गोधडी शिवण्याची ही पद्धत एवढी सोपी आहे की तिच्यासाठी शिलाई मशिन वापरण्याचीही गरज नाही.(simple tips for stitching godhadi at home)

 

शिलाई मशिन न वापरता घरच्याघरी गोधडी कशी शिवायची?

१. गोधडी शिवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला २ ते ३ साड्यांची गरज असणार आहे. या साड्या शक्यतो कॉटनच्याच असाव्या. कॉटनच्या साड्यांची गोधडी अगदी मऊसूत आणि उबदार असते.

भन्नाट ट्रिक- न घासता टेबल फॅन होईल चकाचक! बघा पंख्यावरची धूळ स्वच्छ करण्याचा सोपा उपाय

कॉटनचे बेडशीट, धोतर असंही तुम्ही गोधडी शिवण्यासाठी वापरू शकता.

२. साड्यांपैकी जी साडी सगळ्यात जास्त चांगली आहे ते थोडी बाजुला काढा. तिचा उपयोग गोधडीच्या बाहेरच्या बाजुने करा.

 

३. आता ज्या साड्या किंवा बेडशीट गोधडीच्या आत घालायचे आहे ते पांघरुणाच्या आकाराचे कापून घ्या. साड्या रुंदीला कमी असतात. त्यामुळे एका साडीचे दोन तुकडे करून ते एकमेकांना जोडा. मापासाठी तुम्ही घरातले एखादे पांघरूण घेतले तरी चालेल.

खाेबरेल तेलात २ पदार्थ मिसळून डोक्याला मालिश करा, १ महिन्यात केस गळणं थांबेल

४. आता अशाच पद्धतीने आणखी एखादं बेडशीट किंवा साडी कापून घ्या आणि जी साडी बाहेरून लावणार आहात ती पण कापून घ्या. आत वापरणार आहात त्या दोन्ही साड्या एकमेकांवर ठेवा. त्या साड्यांच्या खाली आणि वर बाहेरून वापरणार आहात ती साडी ठेवा. 

 

५. गोधडी शिवण्यासाठी थोडी मोठी सुई वापरावी. तिला दाभण म्हणतात. आता गोधडीच्या एका काठाचा कोपरा घेऊन तिथून शिवायला सुरुवात करा. उभ्या, आडव्या शिवण देत गोधडी शिवून झाली की एखाद्या साडीचा काठ घ्या आणि त्याचा तुमच्या गोधडीला गोठ लावा. 

 

Web Title: how to stitch godhadi from old saree without using stitching machine, simple tips for stitching godhadi at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.