सुरी, कात्री या आपल्या रोजच्या वापरातील वस्तू.(sharpen scissors) घरातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कात्री-सुरीची आवश्यकता भासते.(life hacks for scissors) पण अनेकदा याची धार बोथट झाली की, कामे अडून राहतात. मग छोट्या कामांसाठी देखील खूप वेळ लागतो.(make scissors sharp again) म्हणून कात्रीची धार कमी झाली असेल तर अगदी घरच्या घरी उत्तम धार लावण्यासाठी काही सोपे उपाय करुन बघा. यामुळे नवीन कात्री विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे देखील मोजावे लागणार नाही. (household hacks)
प्रसिद्ध कटेंट क्रिएटर शिप्रा राय यांनी इंस्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर केला.(Best household hacks for sharpening blunt scissors) त्या म्हणतात कात्रीची धार गेली असेल तर जास्तीचे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण काही घरगुती टिप्सच्या मदतीने कात्रीची बोथट झालेली धार पुन्हा आणू शकतो.(How to keep scissors sharp for longer)
1. कात्रीला धार करण्यासाठी आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या काथ्याचा वापर करु शकतो. यासाठी कात्रीचे ब्लेड उघडल्यानंतर काथ्याने त्यावर हळूहळू घाला. इतकंच नाही तर या काथ्याला कात्रीच्या मधे ठेवून आपण कापू शकतो. यात असणारे तंतू कात्रीच्या ब्लेडवर घर्षण निर्माण करतात. ज्यामुळे त्याची धार तीक्ष्ण होते.
2. कात्रीला धार आणण्यासाठी मीठाचा वापर देखील करता येईल. यासाठी एका भांड्यात थोडे मीठ घ्या आणि कात्रीच्या मध्यभागी ठेवा. आता कात्री बंद करा आणि पुन्हा उघडा. असं वारंवार करा. मिठाचे दाणे कात्रीच्या ब्लेडवर घर्षण निर्माण करतात. ज्यामुळे त्याची धार तीक्ष्ण होते.
तुळशीच्या मंजिरी काढण्याची योग्य पद्धत कोणती? रोप बहरण्यासाठी खास ट्रिक्स- तुळस वाढेल भराभर
3. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम फॉइल पेपरच्या मदतीने आपल्याला कात्रीची धार पुन्हा आणता येईल. यासाठी फॉइल पेपरचा एक तुकडा घ्या आणि त्याची घडी करा. आता याचे कात्रीने लहान तुकडे करा. असं वारंवार केल्याने कात्री धारदार होण्यास मदत होईल.
4. सँडपेपरचा वापर लाकूड किंवा इतर गोष्टी गुळगुळीत करण्यासाठी केला जातो. परंतु, कात्री धारदार करण्यासाठी हे खूप सोपे आणि प्रभावी मानले जाते. सँडपेपरचा एक तुकडा घ्या आणि कात्रीने कापून घ्या. कात्रीची धार येईपर्यंत असे करा. सँडपेपरच्या रखरखीत पृष्ठभागावर कात्रीच्या ब्लेडवर घर्षण तयार होईल ज्यामुळे कात्रीला धार येईल.