Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > फेकू नका! फराळ, पुरी तळल्यानंतर तेल उरले? सोपी ट्रिक, 'या' पद्धतीने वापरा- किडे, मुंग्या जातील पळून..

फेकू नका! फराळ, पुरी तळल्यानंतर तेल उरले? सोपी ट्रिक, 'या' पद्धतीने वापरा- किडे, मुंग्या जातील पळून..

leftover oil use: Diwali kitchen tips: reuse cooking oil: तळलेल्या तेलाचा वापर पुन्हा कसा करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2025 13:17 IST2025-10-24T13:16:47+5:302025-10-24T13:17:47+5:30

leftover oil use: Diwali kitchen tips: reuse cooking oil: तळलेल्या तेलाचा वापर पुन्हा कसा करायचा?

how to reuse leftover oil after frying puris Diwali leftover oil home use ideas eco-friendly ways to reuse used cooking oil natural insect repellent | फेकू नका! फराळ, पुरी तळल्यानंतर तेल उरले? सोपी ट्रिक, 'या' पद्धतीने वापरा- किडे, मुंग्या जातील पळून..

फेकू नका! फराळ, पुरी तळल्यानंतर तेल उरले? सोपी ट्रिक, 'या' पद्धतीने वापरा- किडे, मुंग्या जातील पळून..

दिवाळी संपली...! घराघरात फराळाचा सुगंध दरवळला असेलच. शंकरपाळे, चकली, लाडू, पुरी, करंजी सारखे पदार्थही फस्त झाले असतील.(leftover oil use) प्रत्येक सणात येणारा तळणाचा वास आपल्याला पदार्थांची आठवण करुन देतो.(Diwali kitchen tips) पण या गोडधोड सणानंतर एक गोष्ट मात्र अनेकांच्या मनात येते ती म्हणजे या उरलेल्या तेलाचं करायचं काय? (reuse cooking oil) अनेकजण उरलेलं तेल फेकून देतात, तर काही  पुन्हा वापरतात. पण वारंवार गरम करुन वापरलेले तेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. (home cleaning hacks)
जर आपण हे तेल योग्यरित्या साठवून त्याचा पुन्हा वापर केल्यास त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो. वातावरणातील बदलामुळे घरात डास, किडे किंवा मुंग्या येतात.(natural insect repellent) अशावेळी या तळलेल्या तेलाचा वापर आपण अधिक चांगल्या पद्धतीने करु शकतो. यासाठी काय करायला हवं, पाहूया. 

मुलांसाठी रोज जेवणात ‘ही’ चपाती बेस्ट! डॉक्टर म्हणतात- पचन होईल नीट, आरोग्यासाठी हेल्दी पर्याय

सगळ्यात आधी तळलेले तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असणारे तेल लगेच गाळू नका. यामुळे त्यातील पौष्टिक मूल्य नष्ट होऊ शकतात. तेल थंड झाल्यावर, ते बारीक चाळणीतून किंवा मलमलच्या कापडातून गाळून घ्या. ज्यामुळे जळलेले कण किंवा पीठ निघून जाईल. जे पुन्हा गरम केल्यावर हानिकारक ठरु शकते. स्वच्छ केलेले तेल जास्त काळ टिकते आणि त्याची चव चांगली लागते. 

उरलेले तेल हे नेहमी हवाबंद स्टील किंवा काचेच्या डब्यात साठवा. प्लास्टिकच्या डब्यात तेल साठवू नका. यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकतात. तेल थंड ठिकाणी साठवा. सूर्यप्रकाश किंवा गॅसजवळ ठेवल्याने त्याची चव आणि गुणवत्ता खराब होऊ शकते. एकाच कंटेनरमध्ये एकाच प्रकारचे तेल साठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्याची चव तशीच राहिल. 

या तेलात आपण कापूर घालून झाकून ठेवा. याचा वापर करुन आपण घरातील कीटक, किडे, मुंग्या पळवून लावू शकतो. फरशीच्या कोपऱ्यात, सिंकजवळ किंवा स्वयंपाकघरात जिथे मुंग्या जास्त येतात तिथे या तेलाचे काही थेंब घाला. ज्यामुळे मुंग्या वासाने पळून जातील. तसेच या तेलात आपण थोडा लिंबाचा रस टाकून पुसल्यास स्वयंपाकघरातील वास कमी होऊन ताजेपणा येईल. या तेलाचा वापर आपण झाडांच्या मुळाशी केल्याने यातील मातीतील कीटक कमी होतील आणि रोपे निरोगी राहतील. याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तेल फेकण्याची गरज वाटणार नाही. 
 

Web Title : फेंके नहीं! बचे हुए तेल का प्रभावी ढंग से पुन: उपयोग करें; कीड़ों को दूर भगाएं।

Web Summary : बचे हुए खाना पकाने के तेल को न फेंके! कीड़ों और चींटियों को दूर भगाने के लिए ठीक से स्टोर करें और पुन: उपयोग करें। तेल को ठंडा करें, छानें और एयरटाइट कंटेनर में स्टोर करें। घर और बगीचे के आसपास अतिरिक्त लाभ के लिए कपूर या नींबू मिलाएं।

Web Title : Don't discard! Reuse leftover oil effectively; repel insects and ants.

Web Summary : Don't throw away leftover cooking oil! Properly store and reuse it to repel insects and ants. Cool, filter, and store the oil in an airtight container. Add camphor or lemon for extra benefits around the house and garden.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.