घरातील फ्रिज आणि वॉशिंग मशीन हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. फ्रिज आणि वॉशिंग मशीन या नेहमीच्या वापरातील वस्तू आहेत. या दोन्ही वस्तू नेहमीच्या वापरातील असल्याने त्या जास्त हाताळल्या जातात, तसेच त्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. फ्रिज आणि वॉशिंग मशीन नेहमीच्या वापरातील असल्याने किंवा हलगर्जीपणाने (How to Remove Scratches From Stainless Steel Appliances) हाताळल्यामुळे त्यांच्यावर स्क्रॅचेस म्हणजेच (How To Repair Scratches On Appliances) ओरखडे पडण्याची शक्यता असते. फ्रिज आणि वॉशिंग मशीनवर वारंवार असे स्क्रॅचेस पडले तर ही उपकरणं खराब होतात तसेच जुनी दिसू लागतात. फ्रिज आणि वॉशिंग मशीन ही आपल्या घरातील अत्यावश्यक आणि महागडी उपकरणे असतात. त्यांचा रोजच्या वापरात आपण कितीही काळजी घेतली, तरी वेळोवेळी त्यांच्यावर लहान-मोठे स्क्रॅचेस म्हणजेच ओरखडे पडतात(How to remove scratch marks from the fridge & washing machine).
कधी ही उपकरणं एका जागेवरून दुसरीकडे हलवताना, तर कधी घरातील लहान मुलांच्या हाताने हे स्क्रॅचेस पडतात. फ्रिज आणि वॉशिंग मशीन वरील असे स्क्रॅचेस घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करु शकतो. काही सोपे घरगुती उपाय आणि स्वस्त साधनसामग्री वापरून हे स्क्रॅचेस आपण सहज काढू शकतो. या उपायासाठी कुठले महागडे प्रोडक्ट्स लागतात असंही नाही. यासाठीच, फ्रिज आणि वॉशिंग मशीन वरील असे स्क्रॅचेस घालवण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो ते पाहूयात.
फ्रिज, वॉशिंग मशीन वरील स्क्रॅचेस घालवण्यासाठी नेमकं काय करावं ?
फ्रिज आणि वॉशिंग मशीन वरील स्क्रॅचेस घालवण्यासाठीचा उपाय mommywithatwist या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून खोबरेल तेल आणि व्हिनेगर इतक्याच साहित्याची गरज लागणार आहे. एक बाऊल घेऊन त्यात खोबरेल तेल आणि व्हिनेगर एकत्रित मिसळून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर एक टिश्यू पेपर घेऊन या तयार द्रावणात टिश्यू पेपर भिजवून थेट स्क्रॅचेसवर घासून घ्यावा. त्यानंतर आपण पाहू शकता की, फ्रिज आणि वॉशिंग मशीन वरील स्क्रॅचेस निघून गेलेले असतील.
मूठभर वाळा देतो उन्हाळ्यात गारवा! वाळ्याचे अनोखे ७ उपयोग, स्वस्त, सुगंधी व आरोग्यदायी...
इतरही उपाय आहेत फायदेशीर...
१. टूथपेस्ट वापरा :- नॉन-जेल, व्हाइट टूथपेस्ट घ्या. मऊ कपड्याने थोडी टूथपेस्ट स्क्रॅचवर फिरवा. २ ते ३ मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये थेट स्क्रॅचेसवर घासा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
२. बेकिंग सोडा पेस्ट :- बेकिंग सोडा आणि थोडंसं पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट स्क्रॅचवर लावून सॉफ्ट कपड्याने हलक्या हाताने घासा. नंतर पुसून कोरडं करा.