Join us  

ब्रशने न घासताही टॉयलेट होईल चकाचक! १ एकदम सोपा उपाय; पिवळे डाग आणि दुर्गंधीही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 10:00 AM

How to remove yellow stains from the toilet bowl - 1 Simple trick : टॉयलेट घासून-घासून वैताग आला असेल तर, एकदा 'या' क्लिनिंग हॅकचा वापर करून पाहा..

घरात टॉयलेटचा सर्वाधिक वापर केला जातो (Toilet Cleaning). लोक दिवसभरात सर्वाधिक वापर करतात. सततच्या वापरामुळे टॉयलेट लवकर खराब होते. शिवाय टॉयलेटवर पिवळट डाग दिसतात (Cleaning Tips). जे वेळीच साफ करणं गरजेचं आहे. अन्यथा घरात रोगराई पसरू शकते. खरंतर अस्वच्छ शौचालय म्हणजे आजारांचे माहेरघर. त्यामुळे आठवड्यातून एकदा टॉयलेट साफ करणं गरजेचं आहे.

जर आपल्याला आठवड्यातून एकदा टॉयलेट साफ करायला वेळ मिळत नसेल तर, या एका ट्रिकचा वापर करून पाहा. या क्लिनिंग हॅकच्या मदतीमुळे टॉयलेट पॉट साफ करणं सोपं होईल. काही मिनिटात स्वच्छ होईल. शिवाय वारंवार स्वच्छ करण्याचीही गरज पडणार नाही(How to remove yellow stains from the toilet bowl - 1 simple trick).

टॉयलेट पॉट स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

टॉयलेट साफ करताना त्यावर जमा झालेली घाण, पिवळट डाग, जंतू आणि दुर्गंधी दूर व्हायला हवी. पण साफ करूनही बऱ्याचदा डाग आणि दुर्गंधी तशीच राहते. जर आपल्याला वारंवार कमोड साफ करायचं नसेल तर, फ्लशिंग टँकमध्ये काही वस्तू घाला. यामुळे कमोड कायम क्लिन राहील. यासाठी आपल्याला एक्सपायर्ड औषधं, आंघोळीचा साबण आणि कॉस्टिक सोडा लागेल.

लालबुंद कलिंगड बिंधास्त खाताय? त्या कलिंगडाला इंजेक्शन तर टोचलेलं नाही? जीवावर बेतेल कारण..

टॉयलेट पॉट नेहमी अशा प्रकारे स्वच्छ करा..

सर्वप्रथम, १० ते १२ एक्सपायर्ड गोळ्या घ्या. त्याची बारीक पावडर तयार करा. आता आंघोळीचा साबण किसून घ्या किंवा त्याचे लहान तुकडे करा. आता मिक्सरच्या भांड्यात साबणाचा किस, गोळ्यांची पावडर आणि कॉस्टिक सोडा घाला. ते चांगले बारीक करा. थोडे पाणी घाला. या मिश्रणापासून जमेल तितके गोळे तयार करा. डोळे तयार झाल्यानंतर एका बॉक्समध्ये ठेवा.

पायांवर उन्हामुळे चपलांच्या टॅनिंगचे डाग? हातही काळवंडले? २ घरगुती उपाय-पाय चमकतील

गोळ्यांचा अशा प्रकारे करा वापर

गोळ्या तयार झाल्यावर टॉयलेट पॉटच्या फ्लश टँकमध्ये टाका. रोज फक्त एक किंवा दोन गोळे घाला. यामुळे, शौचालय वापरल्यानंतर जेव्हाही फ्लश कराल, तेव्हा सुगंध तर पसरेलच, शिवाय भांड्यात अडकलेली घाण आणि जंतूही नष्ट होतील. फ्लशिंग टँकमध्ये गोळ्या घालण्यापूर्वी कमोड पॉट क्लीनरने स्वच्छ करा. जेणेकरून वारंवार टॉयलेट वापरूनही घाण होणार नाही. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल