Join us  

बाथरूमचे कोपरे काळेकुट्ट? पिवळे डाग निघत नाही? मिठाचा सोपा उपाय, बाथरूम दिसेल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 2:11 PM

How to remove yellow stains from my tile flooring : बाथरूमच्या टाईल्स खराब झाल्या? ३ टिप्स, काही मिनिटात टाईल्स दिसतील चकाचक..

घराची साफसफाई आपण नियमित करतो. पण बाथरूम (Bathroom Cleaning Tips) आणि किचनची नियमित साफसफाई करणं अशक्य आहे. बाथरूमचा वापर आपण दररोज करतो, पण अनेकदा बाथरूमची सफाई करायला वेळ मिळत नाही. जर आपण वर्किंग वूमन असाल तर, साहजिक दोन किंवा ३ आठवड्यांनी आपल्याला बाथरूमची सफाई करायला वेळ मिळत असेल.

बाथरूम साफ न केल्यामुळे त्यावर पाण्याचे पांढरे, पिवळे आणि काळे डाग पडतात. वेळीच हे डाग साफ नाही केले तर, बाथरूम अधिक घाणेरडे दिसू लागते. हट्टी डाग काढणं सोपं नाही. बाथरूम टाईल्सवर हट्टी डाग तयार होऊ नये, असे वाटत असेल तर, आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करायला हवे (Cleaning Tips). महागडे क्लिनिंग प्रॉडक्ट्सचा वापर करून जर टाईल्स स्वच्छ होत नसतील तर, काही घरगुती उपाय करून पाहा. यामुळे नक्कीच काही मिनिटात टाईल्स स्वच्छ होतील(How to remove yellow stains from my tile flooring).

बेकिंग सोडा

बाथरूमच्या कोपऱ्यात टाईल्सवर हट्टी डाग पडतात. हे डाग सहसा लवकर निघत नाही. हे डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घ्या, त्यात एक चमचा डिटर्जेंट पावडर आणि थोडं पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्पंजवर घेऊन टाईल्सच्या हट्टी डागांवर लावा. २० मिनिटानंतर बाथरूमचे टाईल्स स्पंजने घासून स्वच्छ करा.

सोशल मीडियात लोकप्रिय असलेल्या नागालॅण्डच्या मंत्र्यांनी दीपिका पदूकोणसाठी पाठवली खास भेट, साधेपणा इतका की..

मीठ

जेवणाची चव वाढवण्यासाठी मिठाचा वापर होतो. मिठामुळे पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. पण याचा वापर आपण टाईल्स स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. यासाठी एका वाटीत ३ चमचे मीठ घ्या, त्यात लिंबाचा रस घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट बाथरूमच्या टाईल्सवर स्पंजने लावा. रात्रभर मिठाची पेस्ट टाईल्सवर तशीच ठेवा. सकाळी त्यावर डिटर्जेंट शिंपडून घासून काढून स्वच्छ करा.

लीच सॉक्स काय असतात? काजोलचा सवाल आणि सोशल मीडियात लीच सॉक्सची जोरदार चर्चा

ब्लीच

बाथरूमच्या टाईल्सचे हट्टी डाग काढण्यासाठी आपण ब्लीचचा वापर करू शकता. यासाठी वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात एक झाकण ब्लीच घालून मिक्स करा. तयार मिश्रण बाथरूमच्या फरशीवर लावा. ५ ते १० मिनिटानंतर फरशी साध्या पाण्याने धुवा. या उपायामुळे न घासता बाथरूमचे टाईल्स स्वच्छ होतील.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया