बाथरूममधील कमोड स्वच्छ करणे हे सर्वात कठीण आणि कंटाळवाणे काम असते. दररोज साफसफाई करूनही काहीवेळा कमोडवर पिवळे डाग पडणे, आतून काळपट थर तयार होणे आणि कुबट दुर्गंधी येणे अशी समस्या त्रासदायक ठरतात. अनेकदा महागडे क्लिनर्स वापरूनही कमोडवरचे हट्टी पिवळे डाग जात नाहीत आणि बाथरूममध्ये एक प्रकारची कुबट दुर्गंधी कायम राहते. ही समस्या केवळ स्वच्छतेची नसून आरोग्यासाठीही घातक ठरू शकते(how to remove yellow stains from indian toilet seat).
घर कितीही स्वच्छ असले तरी जर बाथरूम अस्वच्छ असेल किंवा तिथून दुर्गंधी येत असेल, तर संपूर्ण घराची शोभा खराब होते. विशेषतः कमोडवर पडणारे पांढरट किंवा पिवळसर डाग काढताना गृहिणींच्या नाकी नऊ येतात. कितीही घासले तरी ते डाग पूर्णपणे जात नाहीत. पण आता आपल्याला कमोड स्वच्छ करण्यासाठी तासंतास कमोड घासण्याची गरज पडणार नाही. एका साध्या घरगुती 'जादुई पोटली'ने तुमचे काम सोपे होणार आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून आपण एक जादुई पोटली ( potli trick for toilet cleaning) तयार करु शकतो. ही तयार पोटली फक्त फ्लश टँकमध्ये टाकली की, प्रत्त्येक फ्लश सोबतच कमोड होईल स्वच्छ नव्यासारखे चकाचक... जादुई पोटली बनवण्यासाठी लागणारे साहित्य...
मिनिटभरात कमोड स्वच्छ करण्यासाठी जादुई पोटली तयार करण्यासाठी आपल्याला माचिसच्या काड्यांच्या टोकाशी असणारा काळा किंवा लाल भाग काढून घ्यायचा आहे. त्यासोबतच, एक चमचा मीठ, ईनोचे अर्धे पाकीट, थोडीशी टूथपेस्ट आणि अंघोळीच्या साबणाचे उरलेले छोटे छोटे तुकडे इतके साहित्य लागणार आहे. या सर्व साहित्याचा वापर करून आपल्याला असे एक मिश्रण तयार करायचे आहे, जे पाण्यात हळूहळू विरघळेल आणि प्रत्येक फ्लशसोबत स्वच्छतेचे काम करेल.
नेमका कमोड स्वच्छ करण्याचा घरगुती उपाय काय आहे ?
सर्वात आधी माचिसच्या काड्यांच्या टोकाशी असलेला काळा किंवा लाल भाग एका वाटीत एकत्रित जमा करा. आता यामध्ये एक चमचा मीठ, ईनोचे अर्धे पाकीट आणि थोडीशी टूथपेस्ट टाका. हे तयार झालेले मिश्रण आंघोळीच्या साबणाच्या उरलेल्या तुकड्यांसोबत व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे सर्व साहित्य नीट मिसळल्यानंतर त्याची घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्या.
मैत्रिणीसाठी मागवला केक पण 'हॅप्पी बर्थडे' ऐवजी केकवर लिहून आलं असं काही की.. वाचून बसेल धक्का!
या तयार केलेल्या सर्व मिश्रणाला एकत्र करा. आता हे मिश्रण बांधण्यासाठी तुम्ही एक जुना रुमाल वापरू शकता किंवा जुन्या मोज्याचा वापर करून हे मिश्रण त्यात भरू शकता. या मिश्रणाला पोटलीमध्ये यासाठी बांधले जाते जेणेकरून ते फ्लश टँकमध्ये एकाच जागी स्थिर राहील. पोटलीमुळे हे मिश्रण एकदाच वाहून न जाता, प्रत्येक फ्लशच्या वेळी थोडे-थोडे पाण्यात विरघळत राहते. यामुळे तुमची ही 'क्लीनिंग सिस्टीम' अनेक दिवसांपर्यंत टिकते आणि तुम्हाला वारंवार कमोड घासावे लागत नाही.
हा उपाय कसा आहे फायदेशीर...
१. पोटॅशियम क्लोरेट :- माचिसच्या काड्यांवरील पुढील काळया - लाल भागांमध्ये पोटॅशियम क्लोरेट असते, जे स्वच्छतेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.
२. मीठ आणि ईनो :- मीठ आणि ईनो कमोडवरचे हट्टी डाग काढण्याचे काम करतात.
३. साबण :- साबणामुळे प्रत्येक फ्लशमध्ये फेस तयार होतो आणि स्वच्छता टिकून राहते.
Web Summary : Remove stubborn toilet stains and odors with a homemade pouch. Combine matchstick heads, salt, ENO, toothpaste, and soap scraps. Place in the flush tank for a sparkling, fresh toilet with every flush.
Web Summary : जिद्दी टॉयलेट के दाग और दुर्गंध को घर के बने पाउच से हटाएं। माचिस की तीलियों के सिरे, नमक, ईनो, टूथपेस्ट और साबुन के टुकड़े मिलाएं। हर फ्लश के साथ चमकते, ताज़ा टॉयलेट के लिए फ्लश टैंक में रखें।