Join us  

बादल्यांवरचे पांढरे डाग घासूनही निघत नाहीत? चमचाभर बेकिंग सोड्याचा उपाय; बादल्या दिसतील नव्यासारख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2024 4:04 PM

How to remove white stains from the plastic bucket : बकेट्सवरील पांढरे डाग काढणं म्हणजे अवघड काम, यावर आपण लिंबाचाही वापर करून पाहू शकता..

बाथरूममध्ये जास्त वापर पाण्याचा होतो (Cleaning Tips). प्रत्येकीच्या बाथरूममध्ये आपल्याला बादली किंवा मग सापडेल. आपण यांचा वापर पाणी साठवण्यासाठी करतो. पण कालांतराने बादल्या आणि मग लवकर खराब होतात. त्यावर पांढरा थर किंवा मेणचट थर जमा होतो. ज्यामुळे ते अधिक खराब दिसतात. बादली आणि मग खराब झाल्यानंतर, त्यावर डाग पडल्यावर त्याचे रंगही बदलू लागतो.

त्यामुळे अनेकदा पाहुण्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते. अनेकदा बादल्यांवरील पांढरे डाग घासूनही निघत नाही. अशावेळी आपण बेकिंग सोड्याचा वापर करून बादल्या चकाचक स्वच्छ करू शकता. ज्यामुळे बादल्या नव्यासारख्या चमकतील(How to remove white stains from the plastic bucket?).

बेकिंग पावडरने स्वच्छ करा बादल्या

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

लागणारं साहित्य

बेकिंग सोडा

पाणी

अशा पद्धतीने क्लिन करा बादल्या आणि मग

सर्वप्रथम, प्लास्टिकच्या बादल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता एका प्लेटमध्ये २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. आता एक स्क्रबर घ्या. त्या पेस्टमध्ये स्क्रबर बुडवून, बादल्या घासून काढा. आपण या पेस्टने बाथरूममधल्या इतर प्लास्टिकच्या वस्तू घासून काढू शकता.

न वाफवता क्रिस्पी अळूवडीची सोपी कृती, गुजराथी स्टाईल आंबट-गोड चवीची अळूवडी एकदा करून पाहाच..

घासून झाल्यानंतर १० मिनिटांसाठी तसेच ठेवा. १० मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ बादल्या आणि इतर वस्तू धुवून घ्या. अशा प्रकारे बादल्या चकाचक क्लिन होतील, नव्यासारखे दिसतील.

लिंबू

लिंबाच्या रसाचा वापर करून आपण प्लास्टिकच्या बादल्या स्वच्छ करू शकता. लिंबाच्या रसामध्ये अॅसिटिक अॅसिड असते, जे पाण्याचे डाग सहज काढण्यास मदत करतात. बादल्यांवरील पांढरे डाग काढण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावा, ३० मिनिटानंतर बादल्यांवर डिटर्जंट शिंपडून, स्क्रबरने घासून काढा. शेवटी पाण्याने बादल्या धुवा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्वच्छता टिप्स