Lokmat Sakhi >Social Viral > पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील हट्टी डाग निघत नाही? ५ सोपे उपाय- कपडे चमकतील नव्यासारखे

पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील हट्टी डाग निघत नाही? ५ सोपे उपाय- कपडे चमकतील नव्यासारखे

home remedies for stubborn stains: natural ways to clean white clothes: easy tricks to clean stained clothes: तेलाचे, कॉफीचे, चहाचे किंवा चॉकलेटचे काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 12:02 IST2025-06-27T11:57:54+5:302025-06-27T12:02:14+5:30

home remedies for stubborn stains: natural ways to clean white clothes: easy tricks to clean stained clothes: तेलाचे, कॉफीचे, चहाचे किंवा चॉकलेटचे काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून पाहा.

how to remove stains from white clothes cleaning white clothes at Home remove yellow stains from white fabric | पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील हट्टी डाग निघत नाही? ५ सोपे उपाय- कपडे चमकतील नव्यासारखे

पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील हट्टी डाग निघत नाही? ५ सोपे उपाय- कपडे चमकतील नव्यासारखे

अनेकदा खाताना किंवा पिताना पदार्थ आपल्या अंगावर सांडतात.(home remedies for stubborn stains) हे हट्टी डाग दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु, कितीही काही केलं तरी डाग जसेच्या तसे राहतात. कपडे पांढरे शुभ्र असतील तर कपड्यांचा लुक पूर्णपणे खराब होतो.(natural ways to clean white clothes) कपड्यांवरचे डाग निघत नसल्याने आपल्याला ते पुन्हा वापरता येत नाही. अशावेळी आपण याचा वापर पायपुसणीसाठी किंवा लादी पुसण्यासाठी करतो. (whiten clothes without bleach)
आवडते कपडे न वापरता टाकून देताना आपल्याला खरेतर जीवावर येते. शर्ट, टी-शर्ट, साडी, जीन्स किंवा कुर्तीवर तेलाचे, कॉफीचे, चहाचे किंवा चॉकलेटचे काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून पाहा.(cleaning white clothes at home) ज्यामुळे डागही निघतील आणि कपडे नव्यासारखे चमकतील. 

भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार

1. कपड्यांवर तेलाचे किंवा रंगाचे डाग लागले असतील तर काढणे आपल्याला कठीण होते. या डागांना काढण्यासाठी आपल्याला अनेकदा महागड्या केमिकल्स किंवा ड्राय क्लीनिंगचा वापर करावा लागतो. परंतु काही घरगुती उपाय केले तर हे डाग काढण्यास मदत होईल. 

2. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी आपण आंबट दही किंवा ताकाचा वापर करा. १० ते १५ मिनिटे डाग लागलेली बाजू  दही किंवा ताकात भिजवून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने घासा. यामुळे डाग हलके होऊन निघून जाण्यास मदत होईल. 

3. तेल आणि मसाल्याचे डाग काढण्यासाठी आपण लिंबू आणि मिठाचा वापर करायला हवा. लिंबूला कापून त्यावर थोडे मीठ लावा. ज्या ठिकाणी डाग आहे तिथे लिंबू आणि मीठ चोळा. यामुळे डाग तर निघेलच पण कपड्यांचा रंग पांढरा शुभ्र राहिल. 

4. कपड्यांवरील रंगांचे डाग काढण्यासाठी रॉकेलचा वापर आपण करु शकतो. डाग लागलेल्या ठिकाणी थोडेसे रॉकेल घालून काही वेळासाठी तसेच राहू द्या. नंतर हाताने कपडे चोळून डिटर्जंट किंवा साबणाने कपडे धुवा. यामुळे कपड्यांवर डाग निघण्यास मदत होईल. 

5. बेकिंग सोडा हा कपड्यांवरील डाग काढण्यासाठी सोपा उपाय आहे. कपड्यांवर घामाचे किंवा तेलाचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा कपड्यांवर लावून १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर हलक्या हाताने ब्रशने साफ करा. यामुळे डाग निघण्यास मदत होईल. 

 

Web Title: how to remove stains from white clothes cleaning white clothes at Home remove yellow stains from white fabric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.