सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यादिवसांत कित्येकजणी महागड्या सिल्क साड्या हौशीने विकत घेतात आणि मोठ्या उत्साहात नेसतात. पण जवळचं लग्न असेल तर आपल्यामागे कित्येक कामंही असतात. त्या कामाच्या धावपळीत कधीतरी आपल्याकडून साडीकडे दुर्लक्ष होतं आणि मग नव्याकोऱ्या साडीवर काहीतरी सांडतं किंवा कशाचा तरी डाग लागतो. असं काही झालं की सगळ्यात आधी आपण खूप घाबरून जातो आणि त्या साडीसाठी किती पैसे मोजले आहेत, याची मनातल्या मनात उजळणी करू लागतो.. पण असं घाबरून जाऊ नका. कारण काही साधे सोपे उपाय अगदी झटपट केले तर साडीवर पडलेले शाईचे, तेल- तुपाचे, अन्नपदार्थांचे डाग लगेचच निघून जाऊ शकतात.(how to remove stains from silk saree?)
सिल्क साडीवर पडलेले डाग कसे काढून टाकायचे?
तुमच्या सिल्क साडीवर एखादा डाग पडलाच तर लगेच त्याला पाणी लावू नका. एखादा कापसाचा बोळा किंवा मग सुती कपडा, रुमाल घ्या आणि तिथल्या तिथे साडीवर पडलेला पदार्थ टिपून घ्या. तो इकडेतिकडे पसरवू नका.
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा! झणझणती चव ना, रस्सा खातच राहाल.. घ्या पारंपरिक वैदर्भिय रेसिपी
जर साडीवर शाई, तेल, तूप असं काही सांडलं असेल तर डाग पुसून घेतल्यावर त्याठिकाणी थोडी पावडर टाका आणि त्यानंतर ४ ते ५ मिनिटांनी ती अलगदपणे सुती कपड्याने टिपून घ्या. पावडरमुळे साडीवर सांडलेला पदार्थ शाेषून घेण्यास मदत होते.
सिल्क साडीवरचे डाग स्वच्छ करण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नका. व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करा आणि ते अगदी एखादा थेंब त्या डागावर टाकून डाग अलगदपणे पुसून घ्या.
गार-गरम-गोड खाताच दाढ ठणकायला लागते, असह्य वेदना? ५ टिप्स- दाढदुखी टाळण्याचा पाहा सोपा उपाय
तूप किंवा तेलाचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट बनवा. डाग ज्या ठिकाणी पडला आहे अगदी तिथेच ही पेस्ट लावा. त्यानंतर एखाद्या मिनिटाने रुमाल पाण्यात बुडवा, घट्ट पिळून घ्या आणि नंतर ओलसर पाण्याने डाग पुसून काढा.
