आपण कपडे कितीही सांभाळून वापरले तरीही कधी ना कधी घाई, गडबड होते, कुठेतरी काहीतरी चुकतं आणि आपल्या कपड्यांवर तेलाचा, तुपाचा डाग पडतो. कधी कधी ऑफिसला किंवा शाळेला नेलेल्या टिफिनमधून थोडं तेल गळतं आणि नकळतपणे त्याचाही डाग कपड्यावर पडतो. विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मला तर डबा खाताना हमखास तेलाचे डाग लागतातच. अशावेळी ते डाग बऱ्याचदा धुवूनही स्वच्छ निघत नाहीत. डाग पडलेल्या ठिकाणी काळसरपणा दिसतो. यामुळे मग असे डागाळलेले कपडे घालावे वाटत नाहीत. म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा (How to clean Oil Stains From Clothes). हा उपाय केल्याने कपडा एवढा स्वच्छ होईल की डाग नेमका कुठे पडला होता हे लक्षातही येणार नाही.(2 simple home hacks to remove oil stains from clothes)
कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग कसे काढून टाकावे?
कपड्यावर ज्या ठिकाणी तेलाचा डाग पडला असेल तो भाग सुरुवातीला एखाद्या ओलसर सुती कपड्याने तिथल्यातिथे पुसून घ्या. डाग पुसून घेताना तो जास्त पसरला जाणार नाही याची काळजी घ्या.
सावळा गं रंग तुझा..! डस्की, सावळ्या रंगाला शोभून दिसणारे ५ रंग, दिसाल सगळ्यांत सुंदर..
यानंतर कपड्यावर ज्याठिकाणी तेल सांडलं होतं त्या ठिकाणी थोडं मीठ घाला ते मीठ व्यवस्थित पसरवून घ्या आणि त्यावर एखादा पेपर नॅपकिन घाला. आता त्या नॅपकिनवरून इस्त्री फिरवा. त्यानंतर अलगदपणे पेपर नॅपकिन काढून मीठ झटकून घ्या. कपड्यावरचा डाग गेलेला असेल.
हा उपायही करून पाहा.
तेलाचा डाग ज्या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणी थोडं गरम पाणी शिंपडा. त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि थोडा लिंबाचा रस घाला.
हिवाळ्यात 'हे' पदार्थ खा आणि पुढे वर्षभर ठणठणीत राहा, आजारपण तुमच्याकडे फिरकणारही नाही..
आता बोटानेच हलक्या हाताने चोळून बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस तेलाच्या डागावर सगळीकडे लावा. काही वेळाने तो भाग साबण लावून पाण्याने धुवून टाका. डाग अगदी स्वच्छ निघेल.
Web Summary : Oil stains on clothes? No problem! Use salt and a warm iron, or baking soda and lemon, for spotless results. Simple home remedies!
Web Summary : कपड़ों पर तेल के दाग? चिंता न करें! नमक और गर्म इस्त्री, या बेकिंग सोडा और नींबू का उपयोग करें, और दाग गायब हो जाएंगे। आसान घरेलू उपाय!