Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कपड्यांवर तेलाचे डाग पडले? चिमूटभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय- डाग कुठे होता कळणारही नाही

कपड्यांवर तेलाचे डाग पडले? चिमूटभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय- डाग कुठे होता कळणारही नाही

How to Remove Oil Stains From Clothes: कपड्यांवर तेलाचे डाग पडले असतील तर हा एक साेपा घरगुती उपाय करून पाहा..(2 simple home hacks to remove oil stains from clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2025 18:11 IST2025-12-11T18:10:50+5:302025-12-11T18:11:50+5:30

How to Remove Oil Stains From Clothes: कपड्यांवर तेलाचे डाग पडले असतील तर हा एक साेपा घरगुती उपाय करून पाहा..(2 simple home hacks to remove oil stains from clothes)

how to remove oil stains from clothes, 2 simple home hacks to remove oil stains from clothes  | कपड्यांवर तेलाचे डाग पडले? चिमूटभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय- डाग कुठे होता कळणारही नाही

कपड्यांवर तेलाचे डाग पडले? चिमूटभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय- डाग कुठे होता कळणारही नाही

Highlightsकपड्यावर ज्या ठिकाणी तेलाचा डाग पडला असेल तो भाग सुरुवातीला एखाद्या ओलसर सुती कपड्याने तिथल्यातिथे पुसून घ्या.

आपण कपडे कितीही सांभाळून वापरले तरीही कधी ना कधी घाई, गडबड होते, कुठेतरी काहीतरी चुकतं आणि आपल्या कपड्यांवर तेलाचा, तुपाचा डाग पडतो. कधी कधी ऑफिसला किंवा शाळेला नेलेल्या टिफिनमधून थोडं तेल गळतं आणि नकळतपणे त्याचाही डाग कपड्यावर पडतो. विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मला तर डबा खाताना हमखास तेलाचे डाग लागतातच. अशावेळी ते डाग बऱ्याचदा धुवूनही स्वच्छ निघत नाहीत. डाग पडलेल्या ठिकाणी काळसरपणा दिसतो. यामुळे मग असे डागाळलेले कपडे घालावे वाटत नाहीत. म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा (How to clean Oil Stains From Clothes). हा उपाय केल्याने कपडा एवढा स्वच्छ होईल की डाग नेमका कुठे पडला होता हे लक्षातही येणार नाही.(2 simple home hacks to remove oil stains from clothes)

 

कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग कसे काढून टाकावे?

कपड्यावर ज्या ठिकाणी तेलाचा डाग पडला असेल तो भाग सुरुवातीला एखाद्या ओलसर सुती कपड्याने तिथल्यातिथे पुसून घ्या. डाग पुसून घेताना तो जास्त पसरला जाणार नाही याची काळजी घ्या.

सावळा गं रंग तुझा..! डस्की, सावळ्या रंगाला शोभून दिसणारे ५ रंग, दिसाल सगळ्यांत सुंदर.. 

यानंतर कपड्यावर ज्याठिकाणी तेल सांडलं होतं त्या ठिकाणी थोडं मीठ घाला ते मीठ व्यवस्थित पसरवून घ्या आणि त्यावर एखादा पेपर नॅपकिन घाला. आता त्या नॅपकिनवरून इस्त्री फिरवा. त्यानंतर अलगदपणे पेपर नॅपकिन काढून मीठ झटकून घ्या. कपड्यावरचा डाग गेलेला असेल.

 

हा उपायही करून पाहा.

तेलाचा डाग ज्या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणी थोडं गरम पाणी शिंपडा. त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि थोडा लिंबाचा रस घाला.

हिवाळ्यात 'हे' पदार्थ खा आणि पुढे वर्षभर ठणठणीत राहा, आजारपण तुमच्याकडे फिरकणारही नाही..

आता बोटानेच हलक्या हाताने चोळून बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस तेलाच्या डागावर सगळीकडे लावा. काही वेळाने तो भाग साबण लावून पाण्याने धुवून टाका. डाग अगदी स्वच्छ निघेल. 

 

Web Title : नमक और बेकिंग सोडा से कपड़ों से तेल के दाग आसानी से हटाएं।

Web Summary : क्या आपके कपड़ों पर तेल का दाग लग गया है? नमक और बेकिंग सोडा सरल उपाय हैं! नमक लगाकर इस्त्री करें, या बेकिंग सोडा और नींबू का मिश्रण इस्तेमाल करें, फिर धो लें। दाग गायब हो जाएगा!

Web Title : Remove oil stains from clothes easily with salt and baking soda.

Web Summary : Accidentally stained your clothes with oil? Salt and baking soda offer simple solutions! Apply salt and iron, or use a baking soda and lemon mix, then wash. The stain will vanish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.