Join us

कपाटातून कपड्यांचा कुबट वास येतो? महागडे लिक्विड नको- इवलुशी पोटली करेल कमाल- दुर्गंधी होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 13:35 IST

cupboard smell solution: remove musty smell from clothes: wardrobe freshener hacks: महागडे लिक्विड, परफ्यूम वापरण्याऐवजी आपण सोपा उपाय केला तर दुर्गंधी नाहीशी तर होईल आणि कपडे नव्यासारखे राहातील.

पावसाळा सुरु झाला की आपल्याला सगळ्यात जास्त टेन्शन येते ते कपडे न सुकण्याचे. घरभर ओल्या आणि कुबट कपड्यांची दुर्गंधी पसरते. ज्यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न वाटत नाही.(Monsoon Care Tips) पावसामुळे घरातील वातावरण देखील ओलसर असते. ज्यामुळे भिंतीवरही ओलावा पाहायला मिळतो.(cupboard smell solution) यामुळे कपाटात घडी करुन ठेवलेले कपडे देखील काही प्रमाणात ओलसर होतात. या ऋतूत फारसं उन्ह नसल्याने कपडे घरात व्यवस्थित सुकत नाहीत. कपडे वाळले तरी त्याचा कुबट वास येऊ लागतो.(remove musty smell from clothes) कपडे धुताना आपण महागड्या लिक्विडचा वापर करतो. पण कितीही काही केली तरी कपड्यांमधून वास येतो. अनेकजण तर कपाटामध्ये परफ्यूम किंवा अत्तरची बॉटल स्प्रे करतात.(wardrobe freshener hacks) यामुळे कपड्यांवर डाग तयार होतात. पण महागडे लिक्विड, परफ्यूम वापरण्याऐवजी आपण सोपा उपाय केला तर दुर्गंधी नाहीशी तर होईल आणि कपडे नव्यासारखे राहातील. 

पोळ्या करताना लाटण्याला चिकटतात, तुटतात? लाटणं धुण्याच्या २ ट्रिक्स, पोळीही लाटली जाईल मस्त-फुगेल टम्म

पोटली बनवण्यासाठी आपल्याला टिश्यू पेपर, कापूस, अर्धा कापलेला लिंबू, दालिनीची, ४ लवंगा आणि बेबी पावडर किंवा कोणताही पावडर घ्या. ही पोटली बनवण्यासाठी आपल्याला टिश्यू पेपरची घडी घालावी लागेल. त्यानंतर त्याच्या मध्यभागी कापसाचा तुकडा ठेवा. त्यावर काही लिंबाचे थेंब पिळून घाला. ज्यामुळे तो ओला होईल. आता दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग त्यावर ठेवा. कागदावर कोणताही पावडर शिंपडा. आता हा टिश्यू पेपर बंद करुन त्याला गुंडाळा. रबर किंवा धाग्याने घट्ट बांधा. 

ही पोटली आपल्याला वॉर्डरोबच्या एका कोपऱ्यात ठेवावी लागेल. हे आपण कपड्यांच्यामध्ये, ड्रॉवर किंवा वॉर्डरोबच्या तळाशी देखील ठेवू शकता. यामध्ये असणारे दालचिनी आणि लवंग आपला सुगंध हळूहळू पसरवण्यास मदत करतील. लिंबाचा रस आणि पावडर या सुगंधाला जास्त काळ टिकण्यास मदत करतात. पावडर यातील ओलावा शोषून घेते. ज्यामुळे कपाटातील ओलसरपणा कमी होतो. 

या पोटलीमुळे कपाटातील हवा फ्रेश होईल आणि यामुळे कुबट वास येणार नाही. यासाठी आपल्याला कोणत्याही रासायनिक स्प्रेची किंवा परफ्यूमची गरज भासणार नाही. यामुळे आपले पैसे देखील अधिक वाचतील.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स