घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी घरातील अनेक जागा अशा असतात ज्या कायम खराब दिसतात. त्यालीच एक बाथरुम किंवा टॉयलेट.(Toilet cleaning tips) असं म्हटलं जातं की, सगळ्यात जास्त कीटाणू हे बाथरुम आणि टॉयलेटमध्ये असतात.(Remove yellow stains from toilet) हे साफ करण्यासाठी कितीही महागडं क्लिनिंग प्रॉडक्ट वापरलं, ब्रशने घासलं तरी टॉयलेटवरील पिवळे डाग किंवा काळपट थर सहज जात नाही. अशावेळी टॉयलेट वापरताना नेहमीच घाण वास येतो.(Toilet cleaning hacks) खरं तर हे डाग हार्ड वॉटरमुळे तयार होतात.(Home remedies for toilet cleaning) पाण्यातील खनिजे, युरिनचे अवशेष आणि साबणाचा थर मिळून एक प्रकारचा स्केल तयार होतो. हा स्केल जर वेळेवर काढला नाही तर तो जाड होत जातो आणि टॉयलेटची चमक पूर्णपणे निघून जाते.(Toilet deep cleaning)
पण टॉयलेट साफ करण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरली तर काळेकुट्ट, पिवळे टॉयलेट मिनिटांत साफ होईल. यासाठी आपल्याला काय करायला हवं, जाणून घेऊया. (Natural toilet cleaner)
ब्लाऊज शिवण्याची कटकट नाही! सुपर हिट आहे साडी आणि क्रॉप टॉपची जोडी- पहा ५ आकर्षक हॉट पर्याय
टॉयलेट क्लिन करण्यासाठी आपल्याला एक कप बेकिंग सोडा, १/४ सायट्रिक अॅसिड, १ ते २ चमचे डिशवॉशची गरज लागेल. यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यात बेकिंग सोडा आणि सायट्रिक अॅसिड मिसळा. दोन्ही पावडर मिक्स केल्यानंतर त्यात डिशवॉश लिक्विड घाला. याचा फेस होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण थोडे ओले होईपर्यंत मिसळा.
हे मिश्रण आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये घालून याचा बर्फ तयार करायचा आहे. बर्फ तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. ज्यामुळे हवं तेव्हा आपल्याला वापरता येईल. हे वापरण्यासाठी आपल्याला जिथे काळे-पिवळे डाग आहे तिथे हा क्यूब ठेवायचा आहे. आपण हे टॉयलेट पॉटमध्ये ठेवू शकतो.रात्रभर हे टॉयलेट पॉटमध्ये ठेवल्यानंतर सकाळी फ्लॅश करु शकतो. ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी निघून जाईल. दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ देखील उत्तम पर्याय आहे. एक लिंबू पिळून त्यात चिमूटभर मीठ टाकून मिश्रण तयार करा आणि ते टॉयलेटच्या काठावर व आतल्या जागी लावा. काही वेळाने पाण्याने धुवा. यामुळे दुर्गंधी नाहीशी होते. ही सोपी ट्रिक वापरून पाहिली तर कितीही जुनाट डाग असले तरी टॉयलेट अगदी स्वच्छ आणि चमकदार होईल. घरातील स्वच्छता टिकून राहील आणि दुर्गंधीही कायमची दूर होईल.