आपण रोजच बाथरुम आणि त्याच्या आत ठेवलेल्या सामानाचा वापर करतो. अनेकदा घराची साफसफाई तर केली जाते पण बाथरुमच्या साफसफाईकडे कायम काना डोळा असतो.(remove hard water stains) बाथरुममध्ये असणारे प्लास्टिक, स्टीलची बादली, मग यामध्ये पाणी साठवले जाते. आंघोळ, कपडे धुणे यासह इतर काम आपली झटपट होतात.(clean steel bucket) बादल्यांच्या सततच्या वापरांमुळे शिवाय खारे, गढूळ पाण्यामुळे बादल्या आणखीन खराब होतात.(clean plastic bucket) त्यांच्यावर काळे, मेणचट किंवा कळकट डागांचे थर दिसू लागतात. (soap scum removal)बादल्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. पण साबण आणि डिटर्जंटच्या वापरांमुळे त्या आणखी खराब होतात. त्यांचा रंग उडून जातो.(home cleaning hacks) ज्यामुळे आपल्याला त्या पुन्हा वापरायला हव्या, असे देखील वाटत नाही. पण जास्त मेहनत न घेता, कमी वेळात डाग घालवायचे असतील तर काही सोपे घरगुती उपाय केल्यास फायदा होईल.(hard water cleaning tips) तसेच स्टील आणि प्लास्टिकच्या बादल्या काही मिनिटांत स्वच्छ होतील.
बादल्यांवर डाग पडण्याचे कारण म्हणजे पाणी आणि सतत ओलसर असणारं वातावरण. या दोन्हीमुळे पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि साबणाचे डाग बादलीवर जमा होतात. रोजच्या वापरात आपण याकडे दुर्लक्ष करतो. काही दिवसात ही बादली आपल्याला निस्तेज दिसू लागते. घरात पाहुणे आले किंवा बाथरुम स्वच्छ केलं असलं तरी बादलीवर असणारे मेणचट डाग आपल्या बाथरुमचा लूक खराब करतात. म्हणून अनेकांना वाटतं बादली स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मेहनत, महागडे केमिकल्स आणि वेळ लागतो. पण अशावेळी काही घरगुती सोपे उपाय केल्यास आपल्याला फायदा होईल.
स्टीलच्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण करु शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बादली डिटर्जंटने भरलेल्या कोमट पाण्यात काही मिनिटे भिजवून ठेवावी लागेल. ज्यामुळे घाण सहजपणे निघेल. त्यानंतर बादली पाण्याने स्वच्छ धुवा. हलकी ओलसर राहू द्या. ज्या ठिकाणी डाग आहेत. त्या ठिकाणी २ चमचे बेकिंग सोडा व व्हिनेगरचे मिश्रण लावा. १० मिनिटानंतर स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ धुवा. जर बादलीवर गंज किंवा हट्टी डाग असतील तर मिश्रण पुन्हा लावा. थोडा वेळा तसेच राहू द्या. यामुळे बादलीतील वास देखील दूर होतो, ज्यामुळे ती स्वच्छ आणि चमकदार राहते.
Web Summary : Remove stubborn stains from steel and plastic buckets using vinegar and baking soda. Soak, apply mixture, scrub, and rinse for sparkling results.
Web Summary : विनेगर और बेकिंग सोडा का उपयोग करके स्टील और प्लास्टिक की बाल्टियों से जिद्दी दाग हटाएं। भिगोएँ, मिश्रण लगाएँ, रगड़ें और चमकदार परिणाम के लिए धो लें।