Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नवीन वर्षात घर स्वच्छ करताय? गादी-बेडशीटचा कुबट वास, काळपटपणा दूर करा ‘या’ ४ टिप्सने, काही मिनिटांत दिसेल फरक

नवीन वर्षात घर स्वच्छ करताय? गादी-बेडशीटचा कुबट वास, काळपटपणा दूर करा ‘या’ ४ टिप्सने, काही मिनिटांत दिसेल फरक

mattress cleaning tips: remove musty smell from mattress: bedsheet cleaning: पाहूया गादी आणि बेडशीट स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2025 14:34 IST2025-12-30T14:34:01+5:302025-12-30T14:34:54+5:30

mattress cleaning tips: remove musty smell from mattress: bedsheet cleaning: पाहूया गादी आणि बेडशीट स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.

how to remove bad smell from mattress naturally easy tips to clean mattress at Home best way to clean bedsheets and mattress New Year deep cleaning bedroom tips | नवीन वर्षात घर स्वच्छ करताय? गादी-बेडशीटचा कुबट वास, काळपटपणा दूर करा ‘या’ ४ टिप्सने, काही मिनिटांत दिसेल फरक

नवीन वर्षात घर स्वच्छ करताय? गादी-बेडशीटचा कुबट वास, काळपटपणा दूर करा ‘या’ ४ टिप्सने, काही मिनिटांत दिसेल फरक

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी आपण घरात साफसफाई करायला घेतो. घर स्वच्छ, नीटनेटके असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी घरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करत असतो.(mattress cleaning tips) इतकंच नाही तर पडदे, सोफा, कपाट देखील स्वच्छ करतो पण बऱ्याचदा गादी आणि बेडशीट याकडे दुर्लक्ष होतं. सततच्या वापरामुळे गादीला कुबट वास येणं, डाग पडणं किंवा त्याचा रंग देखील काळपट दिसू लागतो.(remove musty smell from mattress) ही समस्या बहुतेक घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. (bedsheet cleaning)
अनेकदा तर आपण बेडशीट, गादी स्वच्छ करण्यासाठी महागडे केमिकल्स किंवा ड्रायक्लिनचा वापर करतो. पण अशावेळी घरातील काही वस्तूंचा वापर करुन आपल्याला ही समस्या सोडवता येते. पाहूया गादी आणि बेडशीट स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे. (mattress odor removal)

टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यानंतर कॅमल टो- बॉडीशेप विचित्र दिसतो? ४ सोप्या टिप्स, ऑकवर्डही वाटणार नाही

1. आपल्याला गादी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा लागेल. आपल्याला संपूर्ण गादीवर बेकिंग सोडा शिंपडून त्याचा थर तयार करावा लागेल. चार ते पाच तासानंतर व्हॅक्यूम क्लिनर किंवा ब्रशने स्वच्छ करा. बेकिंग सोडा गादीमधील ओलावा शोषून घेतो आणि दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो. 

2. गादी, बेडशीट रोज वापरले जाते. त्यामुळे त्याच्यावर धूळ आणि घाणीचा थर साचतो. हाताने हे सगळं स्वच्छ करणं आपल्याला कठीण जातं. गाद्यांच्या आत खोलवर असलेली धूळ आणि घाण काढण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनर वापरु शकता. जर आपल्याकडे व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करता येईल. 

3. गादी जर महिन्याभरात साफ केली नाही तर त्यावर बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन वाढते. ओलावा कधीकधी कीटकांना आणि दुर्गंधीला कारणीभूत ठरतो. यासाठी गादी आपल्याला उन्हात वाळवावी लागेल. गादी वाळवण्यासाठी फक्त सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी ठेवा. ज्यामुळे याच्या आतील बॅक्टेरिया नष्ट होतील. 

4. आपल्या गादीला किंवा बेडशीटला डागांपासून किंवा धुळीपासून वाचवायचे असेल तर गाद्यांचे कव्हर वापरु शकता.  बाजारात आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अनेक वेगवेगळे गाद्याचे कव्हर उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी कमी किमतीत सहज खरेदी करू शकता. याच्यामुळे गाद्या स्वच्छ राहतील, डागही पडणार नाही. 

Web Title : नए साल में आसान टिप्स से गद्दे और चादरें साफ करें।

Web Summary : बेकिंग सोडा, वैक्यूम और धूप में सुखाकर गद्दे और चादरें साफ करें। दाग और धूल से बचाने के लिए गद्दे के कवर का उपयोग करें, ताकि घर साफ और ताजा रहे।

Web Title : Clean mattress and bedsheet easily with these simple tips for New Year.

Web Summary : Clean mattress and bedsheets with baking soda, vacuuming, and sun drying. Use mattress covers to prevent stains and dust for a fresh, clean home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.