Lokmat Sakhi >Social Viral > किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

kitchen sink cleaning tips: remove foul smell from sink: काही घरगुती टिप्सचा अवलंब केल्यास आपण किचन सिंकची दुर्गंधी नाहीशी करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2025 13:23 IST2025-08-10T13:21:43+5:302025-08-10T13:23:06+5:30

kitchen sink cleaning tips: remove foul smell from sink: काही घरगुती टिप्सचा अवलंब केल्यास आपण किचन सिंकची दुर्गंधी नाहीशी करु शकतो.

how to remove bad smell from kitchen sink naturally natural methods to make kitchen sink smell fresh | किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

स्वयंपाकघर हे प्रत्येक गृहिणीसाठी खास असते. तिथे काम करताना अनेकांना अनुभव येतो की बेसिंगच्या सिंकमध्ये अन्नपदार्थ अडकून राहतात.(Kitchen sink cleaning hacks) वारंवार साफ करुन देखील कधी पाणी जाण्यास अडचण होते तर कधी त्याचा कुबट वास येऊ लागतो.(remove foul smell from sink) अशावेळी कितीही पाणी घातल तरी दुर्गंधी काही कमी होत नाही. (natural sink cleaning methods)
सिंकचा वास येऊ लागला की, आपल्या जेवण बनवणं देखील कठीण होऊ लागते.(kitchen odor removal) यामुळे घरातील वातावरण बिघडत नाही तर जंतू निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते.(kitchen hygiene tips) पण अशावेळी काही घरगुती टिप्सचा अवलंब केल्यास दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होईल. 

पावसाळ्यात कांदे-बटाटे लवकर सडतात-हिरवे कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे-बटाटे टिकतील महिनाभर

कंटेंट क्रिएटर शिप्रा राय यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्या म्हणतात, बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास स्वयंपाकघरातील सिंकमधून येणारा वास दूर होईल. बेकिंग सोडा सिंकच्या पाईप्समध्ये जमा झालेली घाण काढण्यास मदत करते. गरम पाण्यामुळे जंतू मरण्यास मदत होईल, ते कसे पाहूया. 

सगळ्यात आधी आपल्याला स्वयंपाकघरातील सिंकच्या पाईपमध्ये हळूहळू बेकिंग सोडा टाकावा लागेल. १० ते १५ मिनिटांनंतर आपल्याला बेकिंग सोड्यावर गरम पाणी ओता. ज्यामुळे पाईपमधील घाण निघून जाईल. जर घाण खूप जास्त असेल तर ही प्रक्रिया आपल्याला पुन्हा करावी लागेल. 


जर आपल्या सिंकमधून खूप दुर्गंधी येत असेल आणि चिकट झाले असेल तर २ चमचे बेकिंग सोडा, १/२ कप पांढरा व्हिनेगर, १ कप गरम पाणी, लिंबाचा रस लागेल. सिंक साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करुन सिंक स्क्रबरने स्वच्छ करा. याशिवाय आपल्याला सिंकच्या आतमध्ये ड्रेनेजच्या भोवती बेकिंग सोडा घालून १० मिनिटे ठेवायला हवा. वरुन व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा. हे द्रावण सिंकमध्ये ओता. सिंकच्या पाईपमध्ये अडकलेली घाण किंवा ग्रीस स्वच्छ होण्यास मदत होईल. यावर गरम पाणी ओतल्यास दुर्गंध देखील नाहीसा होतो.

Web Title: how to remove bad smell from kitchen sink naturally natural methods to make kitchen sink smell fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.