हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. ज्यामुळे आपल्याला अधिक थंड वाटू लागते. यावेळी आपल्याला थंडगार पाण्याला सुद्धा हात लावण्याची इच्छा राहात नाही.(winter water tank tips) टाकीतले पाणी इतके थंड असते की आंघोळ करणे, कपडे धुणे किंवा भांडी घासण्यासाठी देखील आपल्याला नाकी नऊ येतात.(home water tank winter tips) इतकंच नाही तर सतत गीजर सुरु केल्यावर वीज बिल देखील भरमसाठ येतो.(how to keep water warm in winter)
काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन आपण टाकीतले पाणी जास्त वेळ गरम ठेवू शकतो. टाकीतले पाणी गरम ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, जाणून घेऊया. (winter water tank tips)
साड्या अनेक, ब्लाऊज मात्र एकच! ऑफिस वेअरसाठी पाहा पुढच्या गळ्याच्या ५ स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स
1. थर्माकोल हे चांगले इन्सुलेटर आहे. जे बाहेरील थंड हवा आणि आतील उष्णता बाहेर पडण्यापासून रोखते. यासाठी आपण पातळ थर्माकोल शीट खरेदी करु शकतो. याला टाकीभोवती आणि झाकणावर टेप किंवा दोरीने बांधा. थर्माकोल हिवाळ्यात टाकीसाठी उष्णता निर्माण करेल ज्यामुळे टाकीचे पाणी गरम राहिल.
2. थर्माकोलचा वापर करायचा नसेल तर पूर्ण टाकी गोणी किंवा जाड कापडाने झाकून ठेवा. पूर्ण झाकल्यानंतर वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून दोरीने बांधा. जाड कापड किंवा गोणी उष्णता टिकवून ठेवते. तसेच सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर टाकीच्या आतील पाणी गरम करण्यास मदत करते.
3. टाकीला डार्क रंग मारु शकता ज्यामुळे आपल्याला फायदा होईल. जसं की नेव्ही ब्लू, काळा किंवा डार्क लाल. डार्क रंग उष्णता लवकर शोषून घेतात. तर हलक्या रंगांमुळे उष्णता लगेच उत्सर्जित होते. हिवाळ्यात सूर्यप्रकाश जेव्हा कमी असतो तेव्हा डार्क रंग ती उष्णता शोषून घेण्याचे काम करते. ज्यामुळे टाकीतील पाणी गरम राहिल.
4. टाकीपासून नळाकडे जाणाऱ्या पाईप्सचा विचार करायला हवा. या पाईप्सना आपण कव्हर करायला हवे. ज्यूट स्ट्रिप, जुन्या कापडाची पट्टी किंवा कव्हरने गुंडळा. ज्यामुळे त्यावर उष्णता टिकून राहिल आणि टाकीतले पाणी देखील गरम राहिल.
5. टाकीला आपण चारही बाजूने लाकडी पेटी बांधू शकता. ही पेटी टाकीवर बसवा. लाकूड आणि टाकीमधील रिकामी जागा आपण वाळू किंवा गवताने भरू शकता. ज्यामुळे टाकीचे गारव्यापासून रक्षण होईल आणि पाणी गरम राहिल.
