Lokmat Sakhi >Social Viral > डोअर मॅट सारखी दुमडते, ५ ट्रिक्स- कोपरे सरळ होऊन मॅट दिसेल नव्यासारखी कडक...

डोअर मॅट सारखी दुमडते, ५ ट्रिक्स- कोपरे सरळ होऊन मॅट दिसेल नव्यासारखी कडक...

How To Prevent Or Fix a Door Mat Curling Up At The Corner : How to Fix a Curling Door Mat Corner : 5 Tips to Flatten Door Mat Corner : डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे पुन्हा पहिल्यासारखे सपाट करण्यासाठी झटपट ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 14:27 IST2025-01-28T14:11:01+5:302025-01-28T14:27:42+5:30

How To Prevent Or Fix a Door Mat Curling Up At The Corner : How to Fix a Curling Door Mat Corner : 5 Tips to Flatten Door Mat Corner : डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे पुन्हा पहिल्यासारखे सपाट करण्यासाठी झटपट ट्रिक्स...

How To Prevent Or Fix a Door Mat Curling Up At The Corner How to Fix a Curling Door Mat Corner 5 Tips to Flatten Door Mat Corner | डोअर मॅट सारखी दुमडते, ५ ट्रिक्स- कोपरे सरळ होऊन मॅट दिसेल नव्यासारखी कडक...

डोअर मॅट सारखी दुमडते, ५ ट्रिक्स- कोपरे सरळ होऊन मॅट दिसेल नव्यासारखी कडक...

घराबाहेर किंवा घरातील प्रत्येक खोलीच्या एंट्रन्सला आपण पाय पुसायला डोअर मॅट्स ठेवतो. या डोअर मॅट्सना आपण घाणेरडे, मळके पाय पुसून मगच घरात प्रवेश करतो. घराबाहेर डोअर मॅट्स ठेवणे (How To Prevent Or Fix a Door Mat Curling Up At The Corner) ही एक खूपच गरजेची (How to Fix a Curling Door Mat Corner) वस्तू आहे. घरातील या अनेक डोअर मॅट्स नेहमीच वापरल्या जातात. सतत या डोअर मॅट्स वापरुन वापरुन काहीवेळा त्यांचे कोपरे हे दुमडले जातात. आपल्यापैकी बऱ्याचजणांनी हा अनुभव घेतला असेलही(5 Tips to Flatten Door Mat Corner)

कित्येकदा आपण पाहतो की डोअर मॅट्स या नवीन आणल्यावर अगदी व्यवस्थित सपाट असतात. परंतु काही दिवसांनी त्यांच्या या सततच्या वापराने त्या खराब तर होतातच शिवाय त्यांचे सपाट असणारे चारही कोपरे हळुहळु दुमडू लागतात. असे कोपरे दुमडलेल्या डोअर मॅट्स वापरणे शक्य होत नाही. अशा मॅट्सवर पाय व्यवस्थित पुसता देखील येत नाहीत. अशावेळी हे डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे पुन्हा पहिल्यासारखे सपाट करण्यासाठी आपण काही घरगुती ट्रिक्सचा वापर करु शकतो, या घरगुती ट्रिक्स कोणत्या ते पाहूयात. 

डोअर मॅट्सचे कोपरे दुमडले तर काय करावे... 

१. बर्फाचे खडे :- डोअर मॅट्सचे कोपरे दुमडले तर ते पुन्हा पहिल्यासारखे करण्यासाठी आपण बर्फाच्या खड्यांचा वापर करु शकतो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन ते ग्लास कोपरा दुमडलेल्या भागावर ठेवून द्यावे. त्यानंतर त्या ग्लासच्या भोवती ५ ते ६ बर्फाचे खडे पसरवून ठेवून द्यावेत. मग बर्फाचे खडे विरघळेपर्यंत तसेच ठेवून द्यावे. बर्फाचे खडे विरघळल्यावर ग्लास उचलून पाहाल तर दुमडलेला कोपरा पुन्हा पहिल्यासारखा सपाट झालेला दिसेल.    

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...


सुटीत फिरायला जाताय ? घरातील रोपांना पाणी घालण्याचे टेंन्शन विसरा, वापरा ही खास वस्तू...

२. हेअर ड्रायर :- डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे पुन्हा पहिल्यासारखे करण्यासाठी आपण हेअर ड्रायर आणि इस्त्रीचा वापर देखील करु शकता. यासाठी सर्वात आधी थोडे पाणी घेऊन या डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे हलकेच भिजवून ओले करा. त्यानंतर या ओल्या कोपऱ्यांवर इस्त्री फिरवा किंवा ड्रायरची गरम वाफ सोडा. थोडे सुकेपर्यंत ड्रायर किंवा इस्त्री फिरवत राहा. अशाप्रकारे आपण हेअर ड्रायर किंवा इस्त्रीचा वापर करून डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे पुन्हा पहिल्यासारखे करु शकता. 

३. डबल साईडेड टेप :- डोअर मॅट्सचे कोपरे दुमडू नये म्हणून आपण डबल साईडेड टेपचा देखील वापर करु शकता ही डबल साईडेड टेप आपण दुमडलेल्या कोपऱ्यावर खालच्या बाजूस लावून त्याचा दुसरा भाग खाली जमिनीवर चिकटवून लावू शकता. अशा प्रकारे डबल साईडेड टेपचा वापर करुन आपण डोअर मॅट्सचे कोपरे दुमडण्यापासूनच वाचवू शकतो. 

४. वजनदार वस्तू :- डोअर मॅट्सचे दुमडलेले कोपरे सरळ करण्यासाठी आपण त्याच्या कोपऱ्यावर जड वस्तू देखील काही काळासाठी ठेवू शकता. एखादा जड दगड किंवा विटेचा वापर आपण करु शकता. जड वस्तू या डोअर मॅट्सच्या दुमडलेल्या कोपऱ्यावर ठेवल्यास त्याचे कोपरे पुन्हा पहिल्यासारखे सरळ आणि सपाट होतात. 

५. विरुद्ध दिशेने रोल करा :- वरील उपाय करण्यासोबतच आपण एक सोपा उपाय देखील करु शकतो. डोअर मॅट्सचे कोपरे जिथे दुमडलेले असतात त्याच्या विरुद्ध दिशेला डोअर मॅट्स गुंडाळत रोल करुन फिरवून घ्यावे. त्यानंतर दुमडलेले कोपरे सरळ करुन या रोलवर रबर बँड गुंडाळून २ ते ३ दिवस तसेच ठेवून द्यावे. २ दिवसानंतर रबर बँड काढल्यानंतर आपले डोअर मॅट्स पुन्हा पहिल्यासारखे सपाट झालेले असेल.

Web Title: How To Prevent Or Fix a Door Mat Curling Up At The Corner How to Fix a Curling Door Mat Corner 5 Tips to Flatten Door Mat Corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.