घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू हवाच. झाडूशिवाय घराची स्वच्छता अपूर्णच असते.(Home Cleaning tips) झाडू ही अशी वस्तू आहे की वर्षभरातून एकदाच खरेदी केली जाते. नवरात्रीच्या काळात अनेकजण नवीन झाडू खरेदी करतात.(New broom shedding dust solution) पण सतत झाडूने साफसफाई केल्यास त्याची पानं व काड्या गळून पडतात.(How to stop broom shedding) नवीन झाडू खरेदी केल्यानंतर घर स्वच्छ होण्याऐवजी ते अधिक घाण होते. त्याचा भुसा जास्त निघतो. हा भुसा काढण्यासाठी आपण एक सोपी ट्रिक वापरली तर घर स्वच्छ होईल.(Home cleaning hacks) या सोप्या ट्रिकमुळे काही मिनिटात नव्या झाडूचा भुसा निघेल. शिवाय केर काढताना भुसा घरभर पसरणार नाही.
कढई-तव्यावर तेलाचे डाग, चिकट थर साचला? ३ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील नव्यासारखी चकचकीत
1. कंटेंट क्रिएटर शिप्रा राय म्हणतात की नवा झाडू स्वच्छ करण्यासाठी आपल्याला वॉशिंग ब्रशची आवश्यकता भासेल. यासाठी आपल्याला पॅकेटमध्येच झाडूला हाताने जोरात घासून घ्या. यामुळे झाडूचा सर्व भुसा आणि घाण पॅकेटमध्ये जमा होईल. यानंतर कपडे घासताना जसा ब्रश वापरतो तसाच झाडू घासा.
2. जर आपल्याला ब्रशने झाडू साफ करायचा नसेल तर कंगव्याचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला लांब आणि जाड दातांचा कंगवा घ्यावा लागेल. आता कंगवा झाडूवर ३ ते ४ वेळा फिरवा. तो घासून किंवा ब्रश वरपासून खालपर्यंत फिरवून घ्या. यामुळे झाडूला चिकटलेला भुसा निघेल.
3. नारळाचे तेल हा सुद्धा झाडूचा भुसा काढण्यासाठी चांगला पर्याय आहे. झाडूच्या भोवती ५ ते ६ थेंब खोबऱ्याचे तेल लावा. झाडूला हाताने घासून एक किंवा दोनदा कंगवा फिरवा. याच्या मदतीने सर्व भुसा निघून जाईल. नारळाचे तेल झाडूला ओलावा देतो, ज्यामुळे तो लवकर खराब होत नाही.
4. जर आपल्याला कंगवा किंवा ब्रश वापरायचा नसेल तर बादलीच्या पाण्यामध्ये झाडू बुडवा. पूर्णपणे ओला झाल्यावर बाहेर काढा. यानंतर पाणी दोन ते तीन वेळा स्वच्छ करा. झाडूचा भुसा पूर्णपणे निघाल्यानंतर त्याला उन्हात वाळवा. अशापद्धतीने झाडू स्वच्छ केल्यास घरभर भुसा पसरणार नाही.