सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने बऱ्याच साड्या वापरायला कपाटाबाहेर निघत आहेत. आता साड्या १ ते २ वेळा आणि काही काही साड्या जास्तीतजास्त ३ वेळा नेसून झाल्या की त्या लगेचच इस्त्री करण्यासाठी दिल्या जातात. रोल प्रेस न करता साड्यांना अगदी साधी इस्त्री केली तरी त्यासाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. कधी कधी साड्यांच्या इस्त्रीसाठी एवढे जास्त पैसे खर्च करणंही जिवावर येतं. म्हणूनच आता घरच्याघरी साड्यांना इस्त्री करण्याची एक सोपी ट्रिक पाहून घ्या आणि पैशांची पुरेपूर बचत होईल.(how to press or iron saree?)
साड्यांना घरच्याघरी इस्त्री कशी करावी?
साड्यांना इस्त्री करताना खूपदा अशी भीती वाटते की इस्त्री करताना साडी जळणार तर नाही ना.. मनातली ही शंका अगदी बरोबर आहे कारण साड्यांचं सूत अतिशय नाजुक असतं.
टॉयलेट- बाथरूम स्वच्छ करताना 'ही' चूक ठरते जीवघेणी, टॉयलेट क्लिनर लिक्विड पाहा कसं वापरायचं..
त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की साड्यांना इस्त्री करायची असेल तर इस्त्रीचं सेटींग व्यवस्थित तपासून घ्या आणि ती अगदी माईल्ड ठेवा. काही इस्त्रींच्या हिटिंग ऑप्शनमध्ये सिल्क हा पर्याय दिलेला असतो. तो निवडावा.
यानंतर सगळ्यात आधी साडीच्या फॉलला इस्त्री करावी. साड्यांना इस्त्री करताना ती कधीच खूप रगडून, जोर लावून करू नये. फॉलला इस्त्री करून झाल्यानंतर साडीच्या पदरापासून ते शेवटच्या टोकापर्यंत निऱ्या घालून ती जमिनीवर ठेवावी.
High Neck ब्लाऊजचे ९ बोल्ड डिझाइन्स, हिवाळ्यातल्या लग्नसराईत ‘असं’ स्टायलिश ब्लाऊज एकतरी हवंच..
यानंतर अलगदपणे साडीची एकेक बाजू उचलावी आणि इस्त्री करून ती रोल करून ठेवावी. या पद्धतीने संपूर्ण साडीला इस्त्री करून झाल्यानंतर तिची घडी घालावी आणि पुन्हा एकदा प्रत्येक घडीनुसार इस्त्री फिरवावी. या पद्धतीने साडीला खूप व्यवस्थित इस्त्री करता येते.
