लसणाचा वापर हा स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.(garlic peeling trick) पदार्थाला खमंग फोडणी देण्यापासून त्यांचा स्वाद वाढवण्यासाठी लसूण महत्त्वाचा आहे.(how to peel garlic fast) लसूण खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत.(easy garlic peeling tips) पालेभाज्या, लोणचं आणि चटणीसारख्या विविध पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. जितका जास्त लसूण तितकीच पदार्थांची चव चांगली असं म्हटलं जातं.(kitchen hacks for garlic) लसूण हा चवीत, सुगंधात आणि आरोग्याच्या फायद्यांमध्ये चांगला जरी असला तरी त्यातील एक गोष्ट मात्र प्रत्येक गृहिणीला कंटाळवाणी वाटते ती म्हणजे लसूण सोलणे. (peel garlic in 5 minutes)
छोट्या लसूणच्या पाकळ्या, त्याच घट्ट साल आणि हातावर चिकटलेला वास… कितीही वेळ बसलं तरी काम संपत नाही. विशेषतः जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर ती एक मोठी परीक्षा वाटते.(garlic peeling without knife) खरंतर लसूण सोलणे हे वेळखाऊ आहे. ज्यामुळे घाईच्या वेळी नेमकं काय करावं आपल्याला सुचत नाही. अशावेळी लसूण पाकळ्या सोलण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरुन पाहा.
१. सगळ्यात आधी लसूण भाजी चिरतो तसे देठापासून चिरा. ज्यामुळे पाकळ्या कापल्यानंतर त्या वेगवेगळ्या होतील. त्यात २ चमचे आरोरुट घाला. अॅरोरुट लसणामध्ये मिसळा आणि नंतर हाताने घासून साल काढा. लसणाची साल सहज निघेल आणि जास्त प्रयत्नही करावे लागणार नाही.
२. लसूण सोलण्यापूर्वी सुमारे ५ ते ७ मिनिटे पाण्यात भिजवा. त्यानंतर पाण्यातून काढताना हलक्या हाताने चोळा. साल आपोआप निघून जाईल. पाणी खूप थंड वापरु नका, कोमट आणि सामान्य असावे.
३. लसूण सोलण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरुन लसूण सहजपणे सोलू शकता. हे करण्यासाठी पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. या पाण्यात लसूण पाकळ्या ५ मिनिटे भिजवा. पाच मिनिटांनंतर लसूण काढा आणि हातांनी हलके चोळा.