सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. दिवसेंदिवस उष्णता आणि उकाडा इतका वाढत जात आहे की जीव नकोसा होतो. प्रखर उष्णतेमुळे घराबाहेर पडणे देखील नको वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत घराच्या खिडक्या किंवा भिंतींवर थेट सूर्यप्रकाश (Tips & Tricks Effective Ways To Keep Room Cool In Summer) पडू लागला, की घरातील खोल्या अगदी (Follow These 5 Tips To Keep It Cool Upper Floor Room) भट्टीसारख्या तापून गरम होतात. अशा परिस्थितीत, आपण पंखे, कूलर किंवा एसी चालू करूनही फारसा (Tips for cooling a room fast during summer fast) आराम वाटत नाही. उष्णतेमुळे झोपमोड होते, मन अस्वस्थ राहतं आणि घरात राहणं त्रासदायक होऊन जात(How to Make Your Room Cooler Without AC).
घराच्या भिंती उन्हामुळे इतक्या तापतात की त्या गरम उष्णतेमुळे आपल्याला आणखीनच जास्त गरम होते, घामाच्या धारा लागतात. घरातील वातावरण कूल ठेवण्यासाठी आपण पंखे, कूलर किंवा एसी चालू चालू केले तरी त्यांच्या जास्त वापर केल्याने मोठे, लांबलचक बिल येते. अशावेळी, काही साध्या आणि स्मार्ट उपायांनी ही उष्णता कमी करता येते आणि खोली नैसर्गिकरित्या थंड ठेवता येते. घर आतून थंड ठेवण्यासाठी महागडे उपाय करणं आवश्यक नाही. काही सोपे, स्वस्त आणि घरगुती उपाय वापरले तर खोलीचे तापमान अगदी सहजपणे कमी करता येऊ शकते. यासाठी नेमकं काय करू शकतो ते पाहूयात.
कडक उन्हातही घर आतून थंड ठेवण्यासाठी उपाय...
१. जाड व हलक्या रंगांचे पडदे वापरा :- जर खोलीची खिडकी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल आणि तिथून थेट सूर्यप्रकाश आत येत असेल, तर पहिला उपाय म्हणजे जाड आणि फिक्या रंगाचे पडदे वापरणे. हे पडदे खोलीत सूर्यप्रकाश आणि उष्णता येण्यापासून रोखतात आणि खोलीचे तापमान नियंत्रित ठेवतात. याव्यतिरिक्त, ते सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून फर्निचर आणि भिंतींचे संरक्षण देखील करतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बांबू किंवा लाकडी पडदे देखील वापरू शकता जे पारंपारिक आणि नैसर्गिक लूक देईल तसेच उष्णतेपासून संरक्षण करून खोलीचे तापमान नैसर्गिकरित्या थंड ठेवतील.
रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...
२. खिडक्यांना सन फिल्म / रिफ्लेक्टिव्ह पेपर लावा :- उन्हाळ्यात, सूर्याची किरणे खिडकीच्या काचेतून थेट खोलीत प्रवेश करतात, ज्यामुळे तापमान अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत, आपण खिडकीवर अॅल्युमिनियम फॉइल किंवा उष्णता परावर्तक कागद चिकटवू शकता. हे उष्णता परावर्तक कागद सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि उष्णता आत येऊ देत नाहीत. याचा फायदा असा आहे की तुमची खोली दुपारीही थंड राहते आणि एसी किंवा कूलरची गरज भासत नाही.
३. भिंती आणि छत थंड ठेवण्यासाठी उपाय :- खोलीच्या भिंती आणि छत सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि हळूहळू ती उष्णता रात्रभर खोलीत सोडतात. यामुळे रात्रीही खोली उबदार राहते. हे टाळण्यासाठी, छतावर पांढरा चुना किंवा परावर्तक रंग लावा. हे सूर्याच्या किरणांना परावर्तित करतात आणि उष्णता आत येऊ देत नाहीत. भिंतींना हलक्या रंगात रंगवणे देखील चांगले असते कारण गडद रंग जास्त उष्णता शोषून घेतात.
४. जमिनीवर पाण्याचा फडका किंवा ओली चादर घाला :- जमिनीवर ओलसर सुती चादर किंवा पाणी शिंपडलेली पोत ठेवली, तर उष्णता कमी होते आणि थंडावा निर्माण होतो. याचबरोबर, आपण गार पाण्याचा फडका खिडकीवर पसरवून लटकवून ठेवू शकतो ज्यामुळे थोडा थंड वारा येऊ शकतो.
५. घरात रोपं - हिरवीगार झाडं लावा :- कोरफड, मनी प्लांट, स्पायडर प्लांट आणि स्नेक प्लांट सारखे इनडोअर प्लांट्स खोलीचे तापमान नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात. ही झाडे हवा स्वच्छ ठेवतात आणि ओलावा टिकवून ठेवतात, ज्यामुळे खोली थंड राहते. याशिवाय, नैसर्गिक थंडाव्यासाठी, एका बादलीत पाणी भरून खोलीत ठेवू शकता. या पाण्यांत आपण गुलाबपाणी किंवा पुदिन्याची पाने देखील घालू शकता. यामुळे वातावरण आणखी ताजेतवाने होईल. याचबरोबर रोपं - झाडं सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि हवा थंड ठेवण्यास मदत करतात.
स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...