Join us

दिवाळीत पणत्यांमध्ये महागडं तेल घालायला नको वाटतं? फक्त १० रुपयांचा उपाय- लावा भरपूर पणत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 13:09 IST

Diwali 2025: दिवाळीत घरभर पणत्या लावण्यासाठी यंदा तेलाच्या ऐवजी एका वेगळ्याच खास पदार्थाचा वापर करून पाहा..(use of wax instead of oil in diwali for lighting lamps)

ठळक मुद्देपेटून शांत झालेल्या पणत्यांंमधील मेण पुन्हा गरम करून पातळ करा आणि पुन्हा पणत्यांमध्ये भरून पणत्या लावा. आहे की नाही स्वस्तात मस्त ट्रिक?

दिवाळी म्हणजे वर्षाचा सगळ्यात मोठा सण. या सणाच्या निमित्ताने अगदी स्वत:पासून ते घरापर्यंत कित्येकांसाठी वेगवेगळ्या वस्तू घेतल्या जातात. घर सजवलं जातं. नवनविन वस्तूंची खरेदी होते. शिवाय फराळाचे वेगवेगळे पदार्थही असतातच.. या सगळ्यांमध्ये भरपूर पैसे खर्च होतात. शिवाय दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट. यानिमित्ताने आपण आकाश दिवा लावतो, घराला लायटिंग करतो. पण पणत्यांच्या शांत, तेजस्वी आणि प्रसन्न ज्योतींची सर या लखलखाटाला येत नाही. त्यामुळे अगदी हौशीने आपण घरात, अंगणात पणत्या लावतो. पण पणत्या लावताना कधी कधी जीव थोडा थोडा होतोच. कारण पणत्यांसाठी भरपूर तेल लागते आणि सध्या तेलाच्या किमती तर भयंकर वाढल्या आहेत. अशावेळी पणत्यांमध्ये तेल न टाकताही घरभर पणत्यांचा मंद प्रकाश पसरवून टाकायचा असेल तर पुढे सांगितलेला खास उपाय करून पाहा..(how to use wax instead of oil in diwali for lighting lamps?)

 

दिवाळीत तेलाऐवजी लावा मेणाच्या पणत्या..

यंदाच्या दिवाळीत तेलाच्या ऐवजी मेणाच्या पणत्या लावण्याचा प्रयोग करून पाहा. तेलाच्या तुलनेत मेण अतिशय स्वस्त आहे. शिवाय पणत्यांमध्ये जर भरपूर मेण घातलं तर त्या पणत्या अगदी दिड ते २ तासही छान तेवतात.

तुम्हीही गरम पाण्यात मध घालून पिता का? तज्ज्ञ सांगतात ही चूक टाळा, कारण....

यासाठी आपल्याला काही फुलवाती आणि २ ते ३ मेणबत्ती लागणार आहेत. मोठ्या आकाराच्या मेणबत्ती घेतल्या तर त्या १० रुपयांत २ मिळू शकतात. किंवा लहान आकाराची मेणबत्ती घेतली तर अगदी १० रुपयांत ५ मिळू शकतात. या मेणबत्त्यांचे बारीक तुकडे करा आणि ते एका स्टीलच्या पातेल्यामध्ये घाला. आता हे पातेले गॅसवर गरम करायला ठेवा आणि मेणबत्त्या वितळून त्यांचे मेण करून घ्या.

 

मेणबत्त्या वितळून त्यांचे मेण तयार होईपर्यंत तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या पणत्या एकत्र करा. प्रत्येक पणतीमध्ये मध्यभागी एकेक फुलवात घाला. यानंतर त्या पणत्यांमध्ये वितळलेलं मेण टाका. त्या मेणामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ते रंगही घालू शकता, जेणेकरून पणत्याही छान रंगबेरंगी दिसतील.

जास्त पावसामुळे मनीप्लांटची पानं पिवळी पडून गळू लागली? ४ टिप्स, मनी प्लांट होईल हिरवागार

आता या पणत्या दिवाळीत वापरा. अगदी एक ते दिड तास त्या छान तेवतील. या पणत्यांमधल्या मेणाचा पुन्हा वापरही करता येतो. पेटून शांत झालेल्या पणत्यांंमधील मेण पुन्हा गरम करून पातळ करा आणि पुन्हा पणत्यांमध्ये भरून पणत्या लावा. आहे की नाही स्वस्तात मस्त ट्रिक? 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Hack: Use Wax in Diyas, Save Money, Illuminate Home

Web Summary : This Diwali, replace expensive oil with affordable wax in diyas. Melt candle wax, add wicks, and create long-lasting, colorful diyas for a brighter, budget-friendly celebration. Reuse the wax for extended use.
टॅग्स :दिवाळी २०२५गृह सजावटसोशल व्हायरल