Lokmat Sakhi >Social Viral > महागडे रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत घरीच तयार करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, सगळे विचारतील घेतलं कुठून..

महागडे रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत घरीच तयार करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, सगळे विचारतील घेतलं कुठून..

homemade room freshener: natural room freshener: budget room freshener: home fragrance ideas: सणसमारंभात घरच्या घरी रुम फ्रेशनर कसं बनवायचं यासाठी सोप्या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 17:42 IST2025-08-29T17:41:49+5:302025-08-29T17:42:19+5:30

homemade room freshener: natural room freshener: budget room freshener: home fragrance ideas: सणसमारंभात घरच्या घरी रुम फ्रेशनर कसं बनवायचं यासाठी सोप्या टिप्स.

how to make room freshener at home in 10 rupees use coffee powder homemade natural air freshener without chemicals | महागडे रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत घरीच तयार करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, सगळे विचारतील घेतलं कुठून..

महागडे रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत घरीच तयार करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, सगळे विचारतील घेतलं कुठून..

सध्या घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आपल्याला सगळीकडे आनंद, उत्साह आणि सकारात्मक पाहायला मिळते.(homemade room freshener) या सणात घरातल्या पाहुणचारासोबत महत्त्वाची असते ती म्हणजे घराचा सुगंध.(Natural room freshener) बाप्पासमोर दिवसभर अगरबत्ती, धुपाचा सुवास कायम दरवळत असतो. पण त्यासोबत काही नैसर्गिक उपाय वापरुन आपण घरातील वातावरण अधिक सुगंधित ठेवू शकतो. ज्यामुळे घरात येणाऱ्या पाहुणेमंडळींना देखील सकारात्मक वाटेल.(budget room freshener) काही काळापूर्वी घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कापूर किंवा नारळाच्या करवंटीचा वापर जास्त प्रमाणात करायचो पण हल्ली याची जागा महागड्या रुम फ्रेशनरने घेतली. (room freshener at home)
घरात कुबट वास येऊ नये म्हणून उदबत्ती, धूप किंवा केवडा, जाई-जुई सारख्या सुगंधीत फुलांचा वापर व्हायचा. घरात काही कार्यक्रमानिमित्त किंवा पाहुणे येणार असतील, सणवाराच्या काळात वातावरण सुगंधी आणि प्रसन्न असावे म्हणून आपण रुम फ्रेशनर हमखास वापरतो.(room freshener in just 10 ruppes) पण अशावेळी महागडे फ्रेशनर वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी अगदी १० रुपयांत घरच्याघरी तयार होणारे रुम फ्रेशनर वापरुन पाहा. पाहूया घरच्या घरी रुम फ्रेशनर कसं बनवायचं. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा टॅरिफ फटका बसणार गवारच्या भाजीलाही, ट्रम्पला गवारचं काय वावडं आहे?

सगळ्यात आधी आपल्याला एकाद असे काचेचे भांडे घ्यावे लागेल त्यात आपला दिवा राहिल. सध्या बाजारात विविध प्रकारचे दिवा ठेवण्यासाठी काचेचे स्टॅण्ड मिळतात. त्यानंतर कॉफी पावडर घ्यावी लागेल. चमचाभर कॉफी पावडर त्यात दालचिनीचा तुकडा आणि वरुन नारळाचे तेल मिक्स करा. त्याच्या खाली मेणाचा किंवा तेलाचा दिवा लावा. जसं जसे काचेचे भांडे गरम होईल. त्याप्रमाणे आपल्या घरात सुगंध दरवळू लागेल. 

घरातल्या ओल्या कचऱ्याचा दुर्गंध घरभर पसरतो? ५ टिप्स-डस्टबिन राहील स्वच्छ-वासही गायब

कॉफी पावडरमुळे घरातील ओलसरपणा, कचऱ्याचा वास किंवा कुबट वास नाहीसा होईल आणि घराला ताजे वातावरण मिळेल. दालचिनीमुळे घरात उबदार सुगंध कयार होतो. ज्यामुळे घर नेहमी आकर्षक वाटते. खोबऱ्याचे तेल हे फक्त त्वचेसाठी नाही तर घराला सुगंधित ठेवण्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे. यात थोडे कापूर किंवा लवंग घातल्यास घरातील नकारात्मकता देखील कमी होईल. तसेच सुकलेल्या लिंबाची साल, वाळलेली फुलं, लवंग आणि वेलची एकत्र करुन पिशवीत बांधून ठेवा. या पिशव्या आपण कपाटात, देवघरात किंवा हॉलमध्ये ठेवल्यास घराचा कोपरा सुगंधित होतो ज्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते.  या सणासुदीच्या काळात महागडे रुम फ्रेशनर विकत घेण्यापेक्षा घराला नैसर्गिक सुगंधाने उजळवून टाका. 
 


Web Title: how to make room freshener at home in 10 rupees use coffee powder homemade natural air freshener without chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.