गणेशोत्सव म्हणजे सगळीकडे आनंदाला, उत्साहाला उधाण.. गणेशाची आरास आपण मोठ्या भक्तीभावाने करतो. त्याच्यासाठी छान सजावट करतो. रोज त्याच्यासाठी ताज्या फुलांचा हार तयार करून त्याला अर्पण करतो. त्यामुळे गणेशोत्सव जेव्हा संपतो तेव्हा आपल्याकडे भरपूर निर्माल्य जमा झालेलं असतं. ज्यांच्या घरी दिड दिवसांचा, ३ दिवसांचा गणपती असतो, त्यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन आता झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बरीच फुलं, दुर्वा जमा झालेली असणार. आता ते इतरत्र कुठेही विसर्जित करण्यापेक्षा त्याच्यापासून खत तयार करा आणि तुमच्या बागेतल्या कुंडीमध्येच टाका (How to Make Fertilizer From Nirmalya?). जेणेकरून निर्माल्याचा सदुपयोग होईल आणि गजाननाप्रती असणाऱ्या आपल्या भावभक्तीचा सुगंध बागेत दरवळत राहील.(how to make fertilizer at home?)
निर्माल्यापासून खत कसं तयार करायचं?
गणपतीला वाहिलेलं जे काही निर्माल्य आहे ते एका मोठ्या कागदावर पसरवून ठेवा. यानंतर त्या निर्माल्यामधल्या उदबत्तीच्या काड्या, कापसाच्या वस्त्रमाळा, अर्धवट जळालेल्या वाती, फुलवातींमधले उरलेले तूप असं सगळं बाजुला काढून टाका. या वस्तूंचा वापर आपल्याला खत तयार करण्यासाठी होऊ शकत नाही.
वजन लवकर कमी करायचं असेल तर व्यायाम कमी करा, वेटलॉस एक्सपर्टचा महिलांना खास सल्ला
यानंतर त्यातली फुलं, दुर्वा, पानं असं जे काही आहे ते वेगळं काढून घ्या. फुलांच्या पाकळ्या करून घ्या. दुर्वा आणि पानं कात्रीने बारीक बारीक कापून घ्या. आता हे सगळं एका मोठ्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये पसरवून ठेवा. दोन ते तीन दिवस ते तसंच पसरवून ठेवा आणि उन्हामध्ये थोडं सुकू द्या.
निर्माल्यामधला ओलावा कमी झाला की एक मोठ्या आकाराची कुंडी किंवा टब घ्या. घरात जर जुना माठ पडून असेल तर त्याचा उपयोगही तुम्ही करू शकता. आता त्या टबच्या तळाशी माती टाका. त्या मातीमध्ये निर्माल्याचा काही भाग पसरवून टाका.
ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींसाठी झटपट तयार करा सुंदर बॅकड्रॉप- ७ डेकोरेशन आयडिया, आरास होईल मस्त
त्यावर पुन्हा एकदा मातीचा थर द्या. त्यावर निर्माल्य घाला. सगळ्यात वर पुन्हा मातीचा थर द्या आणि ही कुंडी काही दिवस तशीच ठेवून द्या. दर आठवड्यातून एकदा तिच्यातली माती खालीवर करा. काही दिवसांतच निर्माल्याचं व्यवस्थित विघटन होईल आणि त्यापासून खत तयार होईल.