गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांची गणपतीची तयारी, वर्गणीची तयारी, ढोल पथकाची तयारी सुरू झालेली आहे. जे लोक स्वत: घरी गणपती तयार करतात ते लोकही जोरात कामाला लागले आहेत. कारण आता याच दिवसांत त्यांना गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करावी लागते. हळूहळू गणरायाची मूर्ती आकार घेते. नंतर त्या मुर्तीवरचे रंगकाम, इतर सजावट अशा कित्येक गोष्टी असतात. म्हणूनच यंदा गणेश मूर्ती कशी तयार करावी याविषयी मनात थोडा गोंधळ सुरू असेल तर ही एक खास पद्धत बघाच.. घरच्याघरी गणपती तयार करणं तुम्हाला अगदी सोपं वाटू लागेल.(simple trick to make eco friendly ganesh murti)
घरीच शाडू मातीचा गणपती कसा तयार करावा?
शाडू मातीचा गणपती घरीच तयार करण्यासाठी सगळ्यात आधी माती चांगली मळून घ्या. त्यामध्ये पाणी योग्य प्रमाणातच पडले पाहिजे. अन्यथा मुर्ती तयार होण्यास वेळ लागतो. किंवा तयार झाली तरी तिला तडे जातात.
यानंतर मातीचा एक मोठा गोळा घ्या आणि तो एखाद्या ताटलीला खाली तेल लावून तिच्यावर ठेवा. चांगला दाबून त्याचा गोलाकार करा आणि नंतर ताटली उलटी करून तो जमिनीवर ठेवा. आता सूप पिण्याचा जो चमचा असतो त्या चमच्यामध्ये माती टाकून तिला गणपतीच्या पोटाप्रमाणे आकार देऊन घ्या.
या चमच्याचा वापर करून तुम्ही अतिशय सुबक गणेश मूर्ती तयार करू शकता. बऱ्याचादा गणपतीचे दोन्ही पाय, दोन्ही हात, दोन्ही कान एकसारखे येत नाहीत. ते अगदी सारखे, प्रमाणशीर यावे यासाठी चमच्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. गणपतीचा चेहरा आणि सोंड तयार करण्यासाठीही चमच्याची मदत कशी घ्यायची त्याचीही एक खास ट्रिक व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेली आहे. व्हिडिओ पाहून गणपती तयार करण्याचं काम बरंच सोपं वाटू लागेल. गणेशोत्सवापुर्वी एकदा नक्की ट्राय करून पाहा.