Join us

हार-तोरणांत वापरलेल्या फुलांचे करा दिवे! देखणी होईल दिवाळीची सजावट - महागड्या पणत्या, तेलाची गरजच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2025 14:23 IST

How to make diya from used flowers for diwali : eco friendly diya ideas : flower diya for diwali : best out of waste diwali decoration : तेल आणि पणत्या न वापरता उरलेल्या फुलांपासून आकर्षक दिवे तयार करण्याची सोपी आणि सुंदर पद्धत...

दिवाळी म्हटलं की घरात सुंदर दिव्यांचा प्रकाश, सजावट आणि फुलांचा सुगंध दरवळतो. दिवाळीत पणत्या आणि तेलाचे दिवे लावून घर उजळवणं ही आपली पारंपरिक परंपरा आहेच, पण आता बदलत्या काळानुसार पर्यावरणपूरक आणि क्रिएटिव्ह सजावटीच्या कल्पनांनाही लोकांचा मोठा प्रतिसाद (best out of waste diwali decoration) मिळतो आहे. आजकाल आपल्यापैकी बरेचजण 'झिरो वेस्ट' आणि पर्यावरणपूरक सजावट करणेच पसंत करतात. यासोबतच, पारंपरिक पद्धतीमध्ये पणत्यांमध्ये तेल, वात आणि नंतर दिव्यांची स्वच्छता... हे सर्व खूप किचकट आणि कंटाळवाणे काम असते. तसेच, दिवाळीच्या दिवसांत घर, देवघरात आणि दारावर लावलेले हार-तोरण काही दिवसांनी सुकतात आणि ते टाकून द्यावे लागतात(flower diya for diwali).

यावर्षी जर तुम्हाला दिवाळीत काहीतरी नेहमीपेक्षा हटके सजावट करायची असेल, पण तेल आणि पणत्यांचा वापर टाळून काहीतरी पर्यावरणपूरक सजावट  करायचे असेल, तर एकदम परफेक्ट आणि साधीसोपी ट्रिक पाहूयात. वापरलेल्या फुलांच्या पाकळ्या, सुकलेले हार आणि तोरणांचा एकही भाग वाया न घालवता, त्यापासून तुम्ही आकर्षक, तेलाचा वापर नसलेले आणि घरीच (How to make diya from used flowers for diwali) तयार करता येणारे सुंदर ‘फुलांचे दिवे’ किंवा ‘फ्लोटिंग फ्लोरल डेकोर’ कसे तयार करु  शकता, याची सोपी ट्रिक पाहा... 

हार, तोरण किंवा सजावटीसाठी वापरलेल्या पाकळ्या फेकून न देता त्याच फुलांपासून सुंदर फुलांचे दिवे तयार करता येतात. या नैसर्गिक दिव्यांनी तुमच्या घराला फक्त सुंदर तेजच मिळणार नाही, तर एक पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं समाधानही मिळेल. तेल आणि पणत्या न वापरता उरलेल्या फुलांपासून आकर्षक दिवे तयार करण्याची सोपी आणि सुंदर पद्धत इंस्टाग्रामवरील pakkalocalrangoli या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. 

कबुतरांचा कलकलाट आणि विष्ठेने हैराण? कुंडीत लावा 'हे' रोप - कबुतर गॅलरीत फिरकणार नाहीत...

फुलांचे सुंदर दिवे तयार करण्यासाठी आपल्याला एक काचेचा पसरट बाऊल, कापसाच्या लांब वाती, चमचाभर तेल, ग्लासभर पाणी आणि हार - तोरणातील वापरलेली फुले व काडीपेटी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

सगळ्यातआधी सुई घेऊन त्यात कापसाची थोडी लांब वात व्यावस्थित ओवून घ्या. त्यानंतर ही सुई फुलांच्या बरोबर मध्यभागी ओवून घ्यावी. फुलांच्या मध्यभागी अशाप्रकारे वाती ओवून घ्याव्यात. त्यानंतर फुलांच्या मध्यभागी ओवून घेतलेल्या वाती पुन्हा एकदा हतने आकार देत गोलाकार वळून घ्याव्यात. आता एक काचेचा बाऊल घेऊन तो पाण्याने भरुन घ्यावा. आपण या पाण्यात चमकी, रंग देखील मिसळू शकता किंवा शोभेचे रंगीबेरंगी दगड, शंख, शिंपले देखील ठेवू शकता. मग या पाण्यात वरुन चमचाभर तेल सोडावे. त्यानंतर वाती ओवून घेतलेली फुल त्या पाण्यावर ठेवून द्यावीत. मग या पाण्यावर तरंगणाऱ्या फुलांच्या  वाती काडीपेटीच्या मदतीने पेटवून घ्याव्यात. वापरलेल्या फुलांचे सुंदर दिवे तयार, आपण हा बाऊल टेबल, खिडक्या किंवा रांगोळीजवळ, घराच्या कानाकोपऱ्यांत ठेवून दिवाळीची स्वस्तात मस्त अशी पर्यावरणपूरक सजावट करु शकता.

बेसन नको, कपभर पोह्याचा करा पांढराशुभ्र ढोकळा! कधीही खा पोटभर, पचायला हलका आणि करायला सोपा...

English
हिंदी सारांश
Web Title : Make Diwali lights from old flowers! Eco-friendly decoration idea.

Web Summary : Repurpose Diwali flowers into beautiful, eco-friendly lights. This simple trick uses flower petals, wicks, water, and oil to create stunning, sustainable decorations, eliminating the need for traditional diyas and oil.
टॅग्स :दिवाळी २०२५सोशल व्हायरलदिवाळीतील पूजा विधीहोम रेमेडी