Join us

फक्त १५ मिनिटांत करा साजूक तुपाच्या फुलवाती, करणं अगदी सोपं आणि उजळतात एक तास प्रसन्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 17:41 IST

How to make Desi Ghee Diya Batti at Home : Simple Ways To Make Desi Ghee Diya Batti At Home : How to make ghee Batti : How to make Desi Ghee Diya Batti : घरच्याघरीच झटपट तयार करता येतील अशी फुलवाती करण्याची इन्स्टंट ट्रिक पाहूयात...

रोज सकाळ, संध्याकाळ अशा दोन्ही वेळा आपण देवापुढे दिवा लावतो. दिव्याशिवाय आपली पूजा अपूर्णच आहे. पूजा किंवा आरती करण्यापूर्वी आपण दिवा लावण्याची सगळी तयारी करतो. देवापुढे दिवा लावण्यासाठी तेल, तूप आणि कापसाच्या वातीची गरज असते. काहीवेळा आपण कापसाच्या वाती एकत्रच (How to make Desi Ghee Diya Batti at Home) एकदा मोठ्या प्रमाणावर वळून ठेवतो. परंतु या फक्त कापसाच्या वाती काहीवेळा व्यवस्थित (Simple Ways To Make Desi Ghee Diya Batti At Home) पेटत नाही, किंवा लगेच विझतात. यासाठीच आपण घरातील तुपाच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या फुलवाती घरीच तयार करु शकतो. यामुळे प्रत्येकवेळी वाती तयार करण्याचा वेळ वाचतो(How to make ghee Batti).

तुपामुळे प्रत्येकवेळी दिवा लावताना हात चिकट होणार नाहीत. जर तुपाच्या वाती आधीच तयार असतील तर तुमचा रोजचा वेळ वाचेल आणि पटकन तुपाचा दिवा लावून होईल. घरच्याघरीच झटपट तयार करता येतील अशी फुलवाती करण्याची इन्स्टंट ट्रिक पाहूयात. या वाती तुम्ही एकदाच तयार करुन ठेवल्यास पुढचे जवळपास २ ते ३ महिने वापरू शकता. घरचे तूप वापरुन इन्स्टंट फुलवाती कशा करायच्या ते पाहा.

घरचे तूप वापरुन इन्स्टंट फुलवाती करण्याची ट्रिक... 

साहित्य :- 

१. साजूक तूप - २ ते ३ कप २. मेणबत्ती - २ ते ३ मेणबत्त्या३. कापूर - ८ ते १० कापूर वड्या ४. फूलवाती-  २० ते ३० (गरजेनुसार)

खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

उन्हाळ्यात घरीच करा मस्त ‘मँगो लस्सी!’ बाहेरच्या लस्सीने मुलांचा घसा बिघडण्याचाही धोका नाही...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात साजूक तूप ओतून ते व्यवस्थित वितळेपर्यंत गरम करून घ्यावे. २. साजूक तूप विरघळल्यानंतर त्यात मेणबत्तीचे तुकडे आणि कापूर वड्या घालाव्यात. हे सगळे जिन्नस वितळून साजूक तुपात एकजीव झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा. ३. आता चॉकलेट तयार करण्याच्या सिलिकॉन मटेरियलच्या साच्यात एक एक फुलवाती ठेवून द्यावी. ४. वाती साच्यांत ठेवून झाल्यानंतर त्यात तयार तुपाचे मिश्रण घाला आणि थोडे थंड झाल्यावर फ्रिजरमध्ये ठेवा. १ ते २ तासांनी फ्रिज उघडून साचा बाहेर काढा आणि साचा उलटा करून वाती हळूवारपणे काढून घ्या.५. गोठवलेल्या वाती एका प्लास्टिकच्या डब्यात भरुन ठेवा, त्यानंतर हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. लागेल तस आपण फ्रिजमधून या वाती बाहेर काढून वापरु शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलपूजा