नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची पूजा - आरती करताना दररोज दिवा व धूप लावले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पूजेत दिव्याचे खास महत्व असते, एवढचं नाही तर दिवे, पणत्या लावून त्यांची सजावट केली जाते. या दिवसांत दिवे लावताना भरपूर प्रमाणात वातींची गरज लागते. दिव्यासाठी लागणाऱ्या वाती वळणे म्हणजे खूपच किचकट (how to make cotton wicks & dhoop at home for puja) आणि वेळखाऊ काम. यासाठीच, बरेचदा आपण दिव्याच्या वाती एकदम एकाच वेळी भरपूर प्रमाणात तयार करून ठेवतो. वाती एकदाच जास्त प्रमाणांत करुन ठेवल्या तर आयत्यावेळी घाईगडबड(Navratri 2025) होत नाही तसेच वाती वळण्यात बराच वेळ जात नाही. यासाठी दिव्याच्या वाती आधीच करून ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. भरपूर प्रमाणात दिव्याच्या वाती आधीच करुन ठेवल्या तर उपयुक्त आणि सोयीचे ठरते(Navratri Special Amazing tricks for making wicks and dhoop for Puja at home).
नवरात्रीसाठी दिव्याच्या वाती झटपट आणि मोठ्या प्रमाणात कशा तयार कराव्यात, यासाठी काही सोप्या आणि इन्स्टंट टिप्स पाहूयात. यासोबतच, आपण सणावारासाठी वापरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून देखील घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने धूप तयार करु शकतो. घरच्याघरीच वाती आणि धूप तयार कसे करायचे ते पाहूयात. काही खास टिप्सच्या मदतीने वाती वळण्याचे किचकट काम मिनिटभरात करता येईल. इतकचं नाही तर एकसारख्या आकाराच्या सुंदर, सुबक वाती तयार करता येतील. नवरात्रीसाठी इन्स्टंट पद्धतीने वाती व धूप तयार करण्याच्या २ भन्नाट ट्रिक्स पाहूयात.
झटपट वाती वळण्यासाठी पाहा २ भन्नाट ट्रिक्स...
१. साजूक तुपातील फुलवात :- एका भांड्यात २ कप साजूक तूप घेऊन ते व्यवस्थित वितळवून हलकेच गरम करून घ्यावे. साजूक तूप वितळयानंतर त्यात ४ ते ५ मेणबत्तीचे तुकडे घालावेत. मग यात ५ ते ६ कापूर घालून ते संपूर्णपणे वितळवून घ्यावेत. आता एक सिलिकॉन मोल्ड घेऊन त्यात प्रत्येकी एक एक फुलवत ठेवावी. मग या मोल्डमध्ये तयार केलेलं मिश्रण ओतावे. थोड्यावेळासाठी ते तसेच ठेवून द्यावे. तूप थंड झाल्यावर ते गोठून कठीण होते. मग या मोल्डमधून एक एक साजूक तुपाची फुलवात अलगद काढून घ्यावी. कमी वेळात झटपट आणि इन्स्टंट पद्धतीने वाती तयार करण्याचे किचकट काम होईल सोपे.
आंबट झालेलं दही फेकून देण्याआधी थांबा! वापरा ५ प्रकारे - दही वाया न जाता मिळतील अनेक फायदे...
२. वापरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा धूप :- आपण सणावारा दरम्यान फुलांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करतो. देवाला फुले अर्पण करतो, सजावटीसाठी फुलांचा वापर करतो किंवा रांगोळी काढण्यासाठी देखील पाकळ्यांचा वापर करतो. परंत्तू त्यानंतर आपण ही फुल निर्माल्य म्हणून फेकून देतो, परंतु असे न करता आपण या फुलांच्या पाकळ्या वापरून त्यापासून धूप घरच्याघरीच तयार करु शकतो. यासाठी वापरलेल्या फुलांच्या पाकळ्या एका बाऊलमध्ये एकत्रित घेऊन त्यात चमचाभर कापूर वड्यांची पूड बारीक करून घालावी. मग यात थोडे साजूक तूप व ४ ते ५ धूप कांड्या बारीक पूड करून घालाव्यात. मग हाताने हलकेच दाब देत सगळे मिश्रण कुस्करुन त्याचे बारीक मिश्रण करून घ्यावे. तयार मिश्रण एका ट्रेमध्ये भरून ६ ते ८ तास सुकण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. मग ट्रे मधून व्यवस्थितपणे सुकलेली धूप वडी काढून घ्यावी. अशाप्रकारे, वापरलेल्या फुलांच्या पाकळ्यांपासून आपण घरच्याघरीच झटपट धूप तयार करु शकतो.