Join us

Navratri 2025: नवरात्रीसाठी अखंड वात तयार करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, दिवा अखंड तेवत राहील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 16:04 IST

Navratri 2025: नवरात्रीसाठी अखंड वात तयार करायची असेल तर ती तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा..(how to make akhand vat for navratri akhand diya)

ठळक मुद्दे विकत मिळणारी जाडसर वात घेणं टाळायला हवं. त्याऐवजी घरच्याघरी वात तयार करण्याची अगदी सोपी पद्धत पाहा..

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत (Navratri 2025). त्यामुळे आता ज्यांच्याघरचे पक्ष झाले आहेत, त्यांच्या घरी नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीच्या प्रत्येक घराच्या परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी ९ दिवस अखंड दिवा लावणे, कलश स्थापना करणे अशा प्रथा मात्र घरोघरी दिसून येतात. आता नवरात्रीच्या अखंड दिव्यासाठी तुम्हालाही घरी अखंड वात तयार करायची असेल तर ती तयार करण्यापुर्वी या काही टिप्स पाहून घ्या.(how to make akhand vat for navratri akhand diya)

नवरात्रीसाठी अखंड वात कशी तयार करावी?

- हल्ली प्रत्येक गाेष्ट विकत मिळते. त्याचप्रमाणे नवरात्रीसाठी लागणारी अखंड वातसुद्धा विकत मिळते. पण ती वात खूप जाड असते. शिवाय ती चांगली जळतही नाही असा अनेकांचा अनुभव आहे.

B12 Deficiency: नेहमीच्याच पोळ्यांमधून मिळेल भरपूर व्हिटॅमिन B12! कणिक मळताना 'हा' पांढरा पदार्थ घाला

त्यामुळे अशी विकत मिळणारी जाडसर वात घेणं टाळायला हवं. त्याऐवजी घरच्याघरी वात तयार करण्याची अगदी सोपी पद्धत पाहा..

 

- वात तयार करण्यासाठी सुरुवातीला थोडा कापूस व्यवस्थित निवडून आणि त्यानंतर पिंजून घ्या.

वयस्कर झालात तरी चेहरा दिसेल विशीतल्या तरुणीसारखा सुंदर, कोमल- ५ टिप्स- वाढत्या वयाला ब्रेक!

यानंतर कापसाचा थोडा भाग दोन बोटांच्या चिमटीत धरून ओढा आणि त्याला पिळ घालत थोडा थोडा कापूस ओढत चला. छान सूत यायला लागेल. ही वात हाताच्या कोपऱ्यापर्यंत लांब झाली की मग ती तिहेरी करावी. अशाच पद्धतीने दुसरी वात तयार करावी आणि दोन वाती एकत्र करून अखंड दिव्यामध्ये घालाव्या.

 

- अखंड दिव्यासाठी आपण जी वात तयार करणार आहोत ती नेहमीच्या वातींपेक्षा तीनपट, चारपट लांब असावी. शिवाय ती वात खूप जाड किंवा खूप बारीक करू नये. तेलात किंवा तुपामध्ये पुर्णपणे वात भिजवून घ्यावी आणि मगच अखंड दिवा प्रज्ज्वलित करावा. जेणेकरून तो शांतपणे तेवत राहातो. 

टॅग्स :नवरात्रीसोशल व्हायरल