Join us
Daily Top 2Weekly Top 5

घर खूप थंड झालं? हिटर न वापरताही घर उबदार ठेवण्यासाठी खास टिप्स, घरातून थंडी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2025 09:40 IST

Home Hacks: हिवाळ्यात घर खूप थंड पडलं असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...(how to keep your house warm in winter season?)

हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले असून थंडीचा कडाका चांगलाच जाणवायला लागला आहे. या दिवसांत घरातही खूप गार वाटतं. कधी कधी तर घर एवढं थंड होऊन जातं की घरात बसवतही नाही. म्हणूनच बरेच लोक या दिवसांत घरात हिटर लावतात. पण हिटरचा खर्च सगळ्यांनाच परवडेल असं नाही. म्हणूनच या काही टिप्स पाहून घ्या आणि घरातल्याच वस्तूंमध्ये थोडे बदल करून घर कसं उबदार ठेवता येऊ शकतं ते पाहा..(how to keep your house warm in winter season?)

 

हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी खास टिप्स..

१. हिवाळ्याच्या दिवसांत दुपारच्यावेळी घराच्या दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा. कारण दुपारच्यावेळी घरात थोडं ऊन येतं आणि त्यानिमित्ताने घरात थोडी उष्णता, उबदारपणा येतो. त्यामुळे ज्या खिडकीतून, दारातून ऊन येतं ते शक्य तेवढ्या वेळ उघडं ठेवा.

हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी, अंगदुखी वाढली? 'या' पद्धतीने शेका दुखरी जागा- काही मिनिटांत बरं वाटेल

२. दुसरा उपाय म्हणजे लोकरीच्या बेडशीट, लोकरीचे पडदे, लोकरीचे उशांचे कव्हर, सोफा कव्हर असे हिवाळ्यात बाजारात मिळतात. ते नक्की खरेदी करा. कारण या गोष्टींमुळे घरात लगेचच उबदारपणा जाणवतो.

 

३. दुपारी ४ नंतर ज्या खिडकीतून किंवा दरवाज्यातून घरात ऊन येत नसेल ती लगेचच बंद करून टाका. कारण सायंकाळी वातावरण जास्त थंडगार होण्यास सुरुवात होते.

नव्या नवरीसाठी लेटेस्ट फॅशनचं मंगळसूत्र घ्यायचंय? ८ सुंदर डिझाईन्स- कमी वजनात घ्या ठसठशीत डिझाईन्स..

४. संध्याकाळी घरात थोडा कोळसा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर असं एकत्र करून जाळा. यामुळे घरात उबदारपणा जाणवायला नक्कीच मदत होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Keep your house warm this winter without using a heater.

Web Summary : To keep your home warm without a heater, open windows during sunny afternoons. Use woolen bedsheets and covers. Close windows by evening. Burn coal or camphor for warmth.
टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी